
वेल्हे, (पुणे) - किल्ले तोरणागड व मेटपिलावरे (ता.राजगड) परिसरात शनिवार (ता.१८) दुपारच्या सुमारास बिबट्या फिरताना दिसून आला आहे. याबाबत तोरणा गडावर आलेल्या पर्यटक व नागरिकांनी मोबाईल मध्ये चित्रीकरण केले आहे गेल्या तीन चार दिवसापासून बिबट्या या परिसरात दिवसा दिसत असल्याने नागरिकांसह पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.