leopard
sakal
मंचर - आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यात बिबट्यांचे वाढते हल्ले आणि वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. यामुळे नागरिकांनी आपल्या घरावर आणि बंगल्यावर बिबट्याची हालचाल टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व प्रकाशासाठी सोलर दिवे बसविण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली आहे. बिबट्याची दहशत आहे, पण सीसीटीव्ही कॅमेरे व सोलर व्यावसायिकांसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत.