

Leopard Spotted on Coconut Tree in Pimpri Khadki
sakal
मंचर : पिंपळगाव_ खडकी (ता आंबेगाव) येथील कामठेमळा परिसरातमंगळवारी (ता. ३०) सकाळी साडे सातच्या सुमारास घरासमोर असलेल्या ३५ फूट उंचीवरील नारळाच्या झाडावर बिबट्या चढल्याचे दृश्य ग्रामस्थांनी पाहिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कोणत्या तरी भक्ष्याच्या पाठलागात बिबट्या थेट झाडावर चढल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.