esakal | बिबट्याच्या डरकाळीची बारामतीकरांना पुन्हा धडकी 
sakal

बोलून बातमी शोधा

leopard

तीन बिबट्यांना जेरबंद केल्यानंतर बारामती परिसरातील बिबट्याचा वावर थांबला, असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात अजूनही बारामती तालुक्याच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

बिबट्याच्या डरकाळीची बारामतीकरांना पुन्हा धडकी 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती तालुक्यातील नीरावागज येथे बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी आज सांगितले. काल बिबट्याने येथील पन्हाळे वस्तीवरील एक शेळी व बोकड उचलून नेले होते. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचा-यांनी पाहणी केल्यानंतर संबंधित ठसे बिबट्याचेच असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिरूर- हवेलीतील कुटुंबांना माहेरचा आधार

तीन बिबट्यांना जेरबंद केल्यानंतर बारामती परिसरातील बिबट्याचा वावर थांबला, असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात अजूनही बारामती तालुक्याच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या घटनेने नीरावागज परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तातडीने पिंजरा  लावून सीसीटीव्ही बसवावेत जेणेकरून बिबट्याला पकडता येईल, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, नीरावागज येथील शेळी व बोकड बिबटयाने फस्त केल्याच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून, नुकसानभरपाई दिली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण

बारामती तालुक्यात पहिला बिबट्या एमआयडीसीतील बाऊली या कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमे-यात 30 जानेवारीच्या सुमारास दिसला होता. त्यानंतर दुसरा बिबट्या 13 फेब्रुवारी रोजी, तर तिसरा बिबट्या 7 जून रोजी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. तीन बिबटे सापडल्यानंतर बारामती तालुक्यातून बिबटया हद्दपार झाला, अशी चर्चा सुरु झाली होती. प्रत्यक्षात मात्र आता नीरावागजसारख्या बागायती पट्टयात बिबट्याचा वावर असल्याचे आढळल्याने पुन्हा शेतक-यात घबराटीचे वातावरण आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामती तालुक्याच्या वनविभागात चिंकाराची संख्या मोठी आहे. मात्र, तीन बिबटे सापडूनही एकाही चिंकाराला बिबट्याने लक्ष्य केलेले नाही, हेही विशेष म्हणाले लागेल. बिबट्याचा वेग विचारात घेता त्याच मार्गक्रमण कोणत्या दिशेने नेमके होणार, याचा अंदाज अद्याप नाही. त्यामुळे तो नीरावागज परिसरातच आहे की, त्याने इतरत्र पलायन केले, याबाबत अंदाजच व्यक्त होत आहेत.