दिव्यांग विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

सुविधा नसल्यास तेथे जाऊन शिकवावे
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसतील किंवा ऑनलाइन पद्धतीचा वापर करून शिकवणे शक्‍य नसेल, तेथे शिक्षकांनी स्वत: त्या गावात जाऊन शिकवावे व त्यासाठी ग्रामपंचायतीकडील सुविधांचा वापर करावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

हडपसर - शाळा बंद असल्याने सर्वसामान्य शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच राज्यातील दिव्यांग शाळा व कार्यशाळां-मधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचा आदेश दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या आदेशानुसार, अंध, मूकबधिर आणि अस्थिव्यंग या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान व विविध ॲपच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या तिन्ही प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील अभ्यासक्रम शिकवावा, असेही या आदेशात नमूद केले आहे, तर मतिमंद प्रवर्गातील विशेष विद्यार्थ्यांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ इंटेलेकच्युअल डिसअेबल्ड, मुंबई या संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून तसेच आवश्‍यकतेनुसार पालकांना या शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करून विशेष मुले-मुली यांना शिक्षण देण्याच्या अनुषगांने कार्यवाही करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

प्राथमिक ऊर्जावापरात भारत तिसऱ्या स्थानावर

मूकबधिर प्रवर्गातील विशेष विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आवश्‍यकतेनुसार, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर दि एम्पॉवरमेंट ऑफ हिअरिंग एम्पॉवरमेंट ऑफ हिअरिंग इम्पेअर्ड, मुंबई यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा वापर करावा. तसेच याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्याचा अभ्यास घेण्यासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे.

StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

राज्यातील दुर्गम भागात ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, अशा कोविड-१९ चा प्रसार झालेला नाही. त्या भागातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कार्यशाळा शासन निश्‍चित करेल त्या दिवसापासून नियमित सुरू होतील. तसेच राज्यातील ज्या भागामध्ये कोरोनाचा प्रसार झालेला आहे, तसेच सक्षम अधिकाऱ्यांनी कोरोनाबाधित क्षेत्र घोषित केलेले आहे, अशा भागातील दिव्यांग विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रातील विशेष शाळा व कार्यशाळेतील विशेष शिक्षकाने विद्यार्थ्याच्या घरी जाऊन शिक्षण द्यावे. या शिक्षकाने कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी दिलेल्या सूचना व निर्देशाचे पालन करावे. सामाजिक अंतर राखण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आयुक्तांनी या आदेशात नमूद केले आहे.

पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

सुविधा नसल्यास तेथे जाऊन शिकवावे
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसतील किंवा ऑनलाइन पद्धतीचा वापर करून शिकवणे शक्‍य नसेल, तेथे शिक्षकांनी स्वत: त्या गावात जाऊन शिकवावे व त्यासाठी ग्रामपंचायतीकडील सुविधांचा वापर करावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online education for disabled students