Leopard Captured
sakal
चाकण - चाकण औद्योगिक वसाहतीतील मल्टिनॅशनल मर्सिडीज बेंज कंपनीमध्ये दोन दिवसापासून बिबट्या शिरला होता. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आले होते. हा बिबट्या भक्षाच्या शोधात कंपनीच्या आवारात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्यानंतर कर्मचारी, कामगार यामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हा बिबट्या कंपनीत काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद झाला.अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी दिली.