

Pimpalwandi Leopard News
esakal
पिंपळवंडी : येथील काकडपट्टा शिवारात बुधवारी(ता.३१) पहाटे साडेपाचच्या सुमारास बिबट्या जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. शेतकरी मयुर नेताजी वाघ यांच्या शेतात अनेक महिन्यांपासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तीन ते चार पिंजरे लावले होते.यापुर्वी याच परिसरात दोन बिबटे देखील जेरबंद करण्यात आले होते.