esakal | पुण्यात रेमडीसिव्हिरचा पुरवठा निम्म्याहून कमीच

बोलून बातमी शोधा

पुण्यात रेमडीसिव्हिरचा पुरवठा निम्म्याहून कमीच

पुण्यात रेमडीसिव्हिरचा पुरवठा निम्म्याहून कमीच

sakal_logo
By
अनिल सावळे -@AnilSawale

पुणे : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना मागणीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी रेमडीसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे पुणे पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णालयांना अजूनही रेमडीसिव्हिरचा तुटवडा भासत आहे.

जिल्ह्यातील ६२३ खासगी कोविड रुग्णालयांमध्ये १६ हजार ६८ ऑक्सिजनयुक्त आणि आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. येथील कोरोना बाधित रुग्णांसाठी प्रशासनामार्फत सोमवारी (ता. ३) पाच हजार ६५ रेमडीसिव्हिरचा पुरवठा करण्यात आला आहे.

जिल्ह्यात रेमडीसिव्हिरचा तुटवडा लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच, त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली शहरी भागात सहा आणि ग्रामीण भागात १२ भरारी पथके कार्यरत आहेत. या भरारी पथकांमार्फत रुग्णालय स्टॉकिस्ट आणि वितरक यांच्याकडील रेमडीसिव्हिरची उपलब्धता आणि त्याचा वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा: जावयाने सासूसोबतच मांडला संसार; बिनसल्यावर उचललं टोकाचं पाऊल

जिल्हा प्रशासनाकडून खासगी कोविड रुग्णालयांना समान तत्त्वावर रेमडीसिव्हिरचा पुरवठा करण्यात येत आहे. या खासगी रुग्णालयांना त्यांच्याकडील बेड्सच्या प्रमाणात रेमडीसिव्हिर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार गरजू रुग्णांसाठीच या इंजेक्शनचा वापर करावा.

- विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी.

पुणे जिल्ह्यातील सोमवारची रेमडीसिव्हिर पुरवठा स्थिती :

  • खासगी रुग्णालये : ६२३

  • ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्स : १६ हजार ६८

  • रेमडीसिव्हिर उपलब्ध : ५ हजार ६५

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा