कारखाना पाच वर्ष ताब्यात द्या, सर्व जागेवर आणतो; पृथ्वीराज जाचक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj Jachak
कारखाना पाच वर्ष ताब्यात द्या, सर्व जागेवर आणतो; पृथ्वीराज जाचक

कारखाना पाच वर्ष ताब्यात द्या, सर्व जागेवर आणतो; पृथ्वीराज जाचक

वालचंदनगर - श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा कारभार गेल्या १७ वर्षापासून बिघडला असून दुरुस्त करण्यासाठी किमान पाच वर्ष तरी लागणार आहेत. सभासदांनी पाच वर्ष कारखाना ताब्यात दिल्यास सर्व जागेवर आणणार असल्याची ग्वाही छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक दिली.

लासुर्णे (ता. इंदापूर) येथे श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणूकीसंदर्भात आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अॅड हेमंत नरूटे, शिवाजी निंबाळकर, सतीश काटे, दिलीप शिंदे, संग्राम निंबाळकर, तुकाराम काळे, रामचंद्र निंबाळकर, आण्णा पाटील, संभाजीराव पाटील, विजय चव्हाण, अशोक काळे, युवराज मस्के उपस्थित होते. यावेळी जाचक यांनी सांगितले की, खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे सर्व माझ्यासाठी आदरणीय आहेत. खासदार पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये लक्ष घालण्यास सुरवात केली. मात्र संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीपासुनच माझ्यावरती कुरघुडीचे राजकारण सुरु झाले.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात काँग्रेस स्वबळावर लढणार : नाना पटोले

पहिल्या बैठकीपासुन अपमान सहन करावा लागला. मात्र सभासदांच्या हितासाठी ते ही केले. गेल्या वर्षीच्या गळीत हंगामामध्ये कारखान्यांमध्ये चांगले अधिकारी घेवून कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वी केला.कारखाना सुरळीत चालण्यासाठी रात्र-दिवसं कारखान्यामध्ये बसून राहिलो. दर्जेदार साखरचे उत्पादन घेतले. तसेच मागील काळातील सुमारे ८ लाख क्विंटल शिल्लक साखरेला व्यापारी विकत घेण्यास नकार देत होते. मात्र समन्वयाने ही साखर विकण्यामध्ये यश आल्याने सभासदांचा फायदा झाला. चालू वर्षीच्या गळीत हंगामात एक टर्बाइन लवकर सुरू न झाल्यामुळे कारखान्याला तोटा सहन करावा लागला.

सध्या कारखान्यामध्ये कुणाचा कुणाला मेळ नाही, कोणी कोणाचं ऐकत नाही. कारखान्याचे स्पेशल ऑडिट करण्याची अनेक वेळा मागणी करुन स्पेशल ऑडिट केले जात नाही. सोमेश्वर कारखान्याची साखर ३२५० प्रतिक्विलंटल दराने विक्री झाली आहे. मात्र, आपल्या कारखान्याच्या संचालक मंडळाने चालू गळीत हंगामातील साखर व मळी उत्पादित होण्यापूर्वीच विक्री केली असल्यामुळे कारखान्याना व सभासदांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. येणाऱ्या तीन-चार गळीत हंगामामध्ये कारखान्याने प्रत्येक हंगामामध्ये १३ ते १४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप न झाल्यास कारखाना अडचणीतून बाहेर पडणार नसल्याचे सांगितले.

आजही कारखान्यामध्ये सभासद व कारखान्याच्या हितासाठी काम करण्यास तयार आहे. मात्र यासाठी चांगल्या टीम वर्कची गरज असल्याचे जाचक यांनी सांगून अप्रत्यक्ष सत्ताधारी संचालक मंडळावर नाराजी व्यक्त केली.

loading image
go to top