खासदार सुप्रिया सुळे यांचे नितीन गडकरींना पत्र

कात्रज-देहूरोड भुयारी मार्गासाठी सुप्रिया सुळेंची केंद्राकडे २३ कोटींची मागणी
Nitin Gadkari
Nitin Gadkarisakal
Updated on

खडकवासला : कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील कात्रज चौक ते नवले पूल दरम्यान दत्तनगर चौक येथील राजमाता भुयारी मार्ग उंच करणे, रुंदी वाढवणे आणि आणखी पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे २३ कोटी रुपये इतक्या निधीची मागणी केली आहे. (pune news)

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना याबाबत सुळे यांनी पत्र पाठविले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याबाबत प्रस्ताव तयार केला असून २३ कोटी इतक्या निधीची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार प्राधान्य क्रमवार निधी मंजूर करून लवकरात लवकर येथील काम सुरू करावे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

Nitin Gadkari
बैलगाडा शर्यतीबाबत स्टंटबाजी सुरु - अजित पवार

बाह्यावळण महामार्गावर दत्तनगर चौकात असलेला भुयारी मार्ग हा वाहतुकीचा प्रचंड ताण असलेला मार्ग आहे. तथापि या मार्गाची उंची आणि रुंदीही कमी नसल्याने सातत्याने याठिकाणी वाहनांची कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी उंची आणि रुंदी वाढविण्याची गरज आहे. याशिवाय या एकाच भुयारी मार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा ताण येतो. त्यामुळे या भुयारी मार्गाला पर्याय ठरतील अशा आणखी दोन भुयारी मार्गाची आवश्यकता आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Nitin Gadkari
ब्रिगेडियर सुनील लिमये यांना यंदाचा अभिमान पुरस्कार

यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्रशासन अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला असून यासाठी २३ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. या परिसरातील वाहतूक आणि नागरिकांची सोय तसेच सुरक्षितता यांचा विचार करता लवकरात लवकर निधीची तरतूद करून काम पूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com