आमच्या पत्राकडे गडकरी पाहतील काय? कोथरुडच्या रहिवाशाचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

letter from a resident of Kothrud to the Union Minister to solve problems
letter from a resident of Kothrud to the Union Minister to solve problems
Updated on


कोथरुड : वसुधा इताशा गृहनिर्माण संस्थेमध्ये राहणाऱ्या राजीव नारायण केतकर यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना ईमेल पाठवत आता तरी आमच्यापत्राकडे पाहणार काय असा प्रश्न विचारला आहे. केतकर यांनी यापूर्वी 26 जून रोजी गडकरींना ईमेल पाठवले होते. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता. आता पाठविण्यात आलेल्याचे काय होईल याबद्दलही केतकर साशंक आहेत.

कोथरूड ते वारजे, कात्रज हा भाग मोठ्या प्रमाणात विकसीत होत आहे परंतु पायाभूत सुविधा नाहीत. महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आदींच्या वादात समस्या तीव्र होत चालल्याने सर्वसामान्यांचा जीव जायची वेळ आली असल्याने गडकरींनी या प्रश्नात लक्ष घालावे असा आग्रह केतकर करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात केतकर म्हणतात की, ''सर कसा होणार सबका साथ सबका विकास? हा मला मोठा पडलेला प्रश्न आहे.  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यालयजवळ असूनही समस्या सुटत नाहीत हे खेदजनक आहे.
 
१. महाराष्ट्र नैसर्गीक वायू महामंडळाचे गॅस पाईप लाईनचे काम सुरु करण्यासाठी सप्टेंबर पासून प्रलंबित आहे. 
२. वारजे उड्डाण पुल ते डुक्कर खिंड हा महामार्ग खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा झाला आहे. तक्रारीकडेराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लक्ष घालत नाही. 
३. वेद भवन ते वारजे या सेवा रस्त्यावर पथदीवे, वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत. रुंदीकरणाचे काम सुरु असून दयनीय अवस्था आहे.  
४. पुणे - सातारा - बंगलोर महामार्गाजवळील सेवारस्त्यावरील कचरा कोणी काढावयाचा या वादातून सगळीकडे कचऱ्याचे साम्राज झाले आहे.

महत्त्वाची बातमी : पुणेकरांनो, घाबरून जाऊ नका; संचारबंदीबाबत पोलिस प्रशासनाचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com