esakal | सिलिंडर गॅसची पातळी ग्राहकांना तपासता येणार I Gas Cylinder
sakal

बोलून बातमी शोधा

Gas Cylinder

सिलिंडर गॅसची पातळी ग्राहकांना तपासता येणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयओसी) एलपीजी सिलिंडरसाठी ‘इंडेन कंपोजिट सिलिंडर’ तयार केले आहेत. सिलिंडरची ही नवी टाकी अर्धपारदर्शक असल्याने ग्राहकांना गॅसची पातळी तपासता येईल. या सिलिंडरमुळे गॅस चोरीसारख्या प्रकारांना आळा बसेल. ही टाकी राज्यात प्रथमच पुण्यात सादर करण्यात आली असल्याचे आयओसी महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक अनिर्बन घोष यांनी सांगितले.

जिल्ह्यात सुमारे अडीच लाख ग्राहक इंडियन सिलिंडरचा वापर करतात. कंम्पोजिट सिलिंडर वजनाने पाच आणि दहा किलोचा असल्याने तो हाताळण्यास सोयीची आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या जुन्या ग्राहकांना ही नवी टाकी घेता येणार आहे. संबंधित वितरकांकडे संपर्क साधून त्याबाबतची पूर्तता केल्यास नव्या स्वरूपातील सिलिंडर त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही घोष म्हणाले.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात दिवसात ५७३ नवे कोरोना रुग्ण

सिलिंडरची वैशिष्ट्ये...

अर्धपारदर्शक असल्याने गॅस पातळी तपासणे शक्य

सुरक्षित व गंजरोधक

इतर सिलिंडरच्या तुलनेत कमी वजन

५ , १० किलो वजनाचे सिलिंडर उपलब्ध

loading image
go to top