esakal | पूरग्रस्तांसाठी ग्रंथालयाचे दान
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रंथालयातील पुस्तकांबरोबर स्नेहल जोशी.

पुस्तकांचे करा दान...
महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दीड हजारांहून अधिक पुस्तके जमा झाली आहेत. त्यात आता चार हजार पुस्तकांची भर पडली आहे. पूरग्रस्त भागातील ग्रंथालये पुन्हा उभी करण्यासाठी पुस्तकप्रेमी, साहित्यिक, वितरक आणि प्रकाशकांनी पुढे यावे. ज्यांना पुस्तकरूपाने मदत करायची आहे, त्यांनी परिषदेशी संपर्क करावा. पुस्तके सुटीचे दिवस वगळून सकाळी साडेनऊ ते दुपारी बारा आणि दुपारी साडेचार ते रात्री आठ या वेळेत परिषदेच्या सेवकांकडे द्यावीत, असे आवाहन प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे.

पूरग्रस्तांसाठी ग्रंथालयाचे दान

sakal_logo
By
संतोष शाळिग्राम

पुणे - कुणी धान्य दिले, कुणी कपडे, कुणी खाद्यपदार्थ... पण, पुण्यातील एका महिलेले अनोखे दान कोल्हापूर, सांगली भागातील लोकांसाठी दिले आहे. सिंहगड रस्ता परिसरात राहणाऱ्या स्नेहल जोशी यांनी त्यांचे चार हजार पुस्तकांचे ग्रंथालय पूरग्रस्त भागातील ग्रंथालयांसाठी दिले आहे.

पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने पूरग्रस्त ग्रंथालयांसाठी पुस्तकरूपाने मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत जोशी यांनी चार हजार पुस्तकांचा ठेवा परिषदेकडे देऊ केला आहे. त्यांच्या या संचितामध्ये वि. स. खांडेकरांपासून ते आताच्या नवलेखकांची अनेक पुस्तके आहेत. कथा-कादंबऱ्या, आत्मचरित्रे, ललित लेख हे त्यांनी ग्रंथालयीन रूपाने जतन केलेले साहित्य कोल्हापूर आणि सांगलीच्या ग्रंथालयांकडे जाणार आहे.

जोशी या उद्योजक आहेत. त्यांचा इलेक्‍ट्रिकल कंटोल पॅनेल बनविण्याचा कारखाना आहे. अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेतलेल्या स्नेहल यांनी वाचनाचा छंद जोपासला. तो वाढविताना त्याचा इतरांनाही लाभ व्हावा म्हणून सिंहगड रस्त्यावर आनंदनगर भागात वाचनालय सुरू केले. त्या १९९३ पासून ग्रंथालय चालवीत आहेत. त्या सांगतात, ‘‘पुरामुळे तेथील ग्रंथालयांचे झालेले नुकसान पाहून पुस्तकांची मदत करावी वाटली. त्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आवाहन वाचले आणि ग्रंथालयरूपाने जपलेला ठेवाच देण्याचा निर्णय घेतला आहे.’’

परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘‘पुस्तकांची मदत करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. परंतु, स्नेहल जोशी यांनी चार हजार पुस्तके दिली आहेत. त्यांचे दातृत्व मोठे आहे. यातून अनेक पुस्तकप्रेमी, साहित्यिक, प्रकाशक पुस्तकदानाचा श्रीगणेशा करतील. ग्रंथालयांना गतवैभव मिळवून देण्यासाठी अशी ग्रंथसाथ मोलाची ठरणार आहे.’

loading image
go to top