General Seth : लष्कराच्या दक्षिण विभागाच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल सेठ

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे ५१वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. लष्करी परंपरेनुसार लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी युद्ध स्मारकात झालेल्या सोहळ्यात, शूरवीरांचे स्मरण करून त्यांना पुष्पचक्र अर्पण केले.
General Seth
General Sethsakal
Updated on

पुणे : लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे ५१वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. लष्करी परंपरेनुसार लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी युद्ध स्मारकात झालेल्या सोहळ्यात, शूरवीरांचे स्मरण करून त्यांना पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर त्यांना दक्षिण विभागाच्या मुख्यालयात ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला.

लेफ्टनंट जनरल सेठ हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे, तसेच डेहराडून येथील भारतीय लष्कर प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या लष्करी कारकीर्दीला २० डिसेंबर १९८६ पासून सेकंड लान्सर्समधील नियुक्तीने सुरुवात झाली. लष्करी प्रशिक्षणाशी संबंधित सर्व अभ्यासक्रमांमध्ये त्यांनी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.

‘यंग ऑफिसर्स’ प्रशिक्षण अभ्यासक्रमात त्यांनी ‘सिल्व्हर सेंच्युरियन’ पुरस्कार पटकावला होता, तर नभोवाणी मार्गदर्शक अर्थात ‘रेडिओ इन्स्ट्रक्टर’ प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि ज्युनिअर कमांड प्रशिक्षण अभ्यासक्रमात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यांनी ‘स्कायनर्स हॉर्स ९८’ सशस्त्र लष्करी तुकडीचे प्रमुख, दहशतवादविरोधी दलाचे (काउंटर इन्सर्जेन्सी युनिफॉर्म फोर्स) प्रमुख, २१ कोअरचे प्रमुख तसेच दिल्ली क्षेत्राचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

१९९५ ते १९९६ दरम्यान संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अंगोला व्हेरिफेकेश मिशन’ मोहिमेचे कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सेठ यांनी भारतीय लष्करात स्वतंत्र आर्मर्ड ब्रिगेडचे मेजर, लष्करी सचिव शाखेचे सहाय्यक लष्करी सचिव, दक्षिण पश्चिम कमांड मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे ब्रिगेडियर जनरल (कार्यान्वय), परिप्रेक्ष्य नियोजन (योजना) विभागाचे उपमहासंचालक आणि शस्त्रास्त्रे आणि उपकरण विभागाचे अतिरिक्त महासंचालक या महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.