
पुणे - महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करत जखमी अवस्थेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने जन्मठेपेसह ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा निकाल दिला. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. अत्याचार केल्यानंतर आरोपी महिलेच्या अंगावरील सोने लुटून पसार झाला होता.