आत्महत्या करायला निघालेल्या व्यक्तिचे शिवसेना अन् पोलिसांमुळे असे वाचले प्राण !

life of the person who went to commit suicide was saved due to Shiv Sena and police in Pune
life of the person who went to commit suicide was saved due to Shiv Sena and police in Pune
Updated on

पुणे ः फेसबुकवर एकाने पोस्ट टाकली की, मी माझे जीवन संपवित आहे.... सातारा जिल्ह्यातील विटा गावातून एकाने पोस्टबद्दलची माहिती शिवसेनेच्या एका आमदाराला कळविली. त्यांनी पुणे पोलिसांना कळविले. पोलिस त्या व्यक्तिच्या घरापर्यंत पोचले. समुपदेशन करून आत्महत्येपासून त्या व्यक्तिला परावृत्त केले. हे घडले अवघ्या 25 मिनिटांत पुण्यामध्ये. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विटा येथून पराग गुळवणी यांनी शिवेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास फोन केला. पुण्यातील एका व्यक्तिने आत्महत्या करीत असल्याची पोस्ट फेसबुकवर केली असल्याचे सांगितले. त्याचा स्क्रिनशॉटही त्यांनी डॉ. गोऱ्हे यांना पाठविला. त्यांनी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकेटेशम यांच्याशी संपर्क साधला. आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास उपायुक्त शिरीश सरदेशपांडे यांच्याकडे सोपविला. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास सुरू केला. 

दरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी तसेच त्यांचे स्वीय सहायक योगेश जाधव यांनी त्या व्यक्तिच्या नावावरून पुण्यात अनेकांकडे चौकशीस प्रारंभ केला. शिवसेनेचे उपशहर प्रमुख किरण साळी यांनी त्या व्यक्तिबद्दलचे तपशील मिळविले. त्यांनी डॉ. गोऱ्हे आणि पोलिसांकडे त्याबाबतची माहिती दिली. त्याच्या आधारे पोलिस त्या व्यक्तिच्या घरी पोचले. परंतु, ती व्यक्ती घरात नसल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्या व्यक्तिपर्यंत पोचले. तिला काय समस्या आहे, याची विचारपूस केली. त्यानंतर त्या व्यक्तिने फेसबुक पोस्ट डिलिट केली. तसेच पोलिस, नातेवाईक आणि शिवसेना कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यावर आत्महत्येचा विचार बदलला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी पुन्हा फेसबुकवर पोस्ट टाकली आणि आत्महत्येच्या निर्णयापासून परावृत्त झाल्याचे स्पष्ट केले. कौटुंबिक कलहातून ती व्यक्ती आत्महत्येच्या निर्णयाप्रत आली होती, असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.

या घटनेबाबत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सतर्क शिवसैनिकांमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे एका व्यक्तिचा जीव वाचविण्यात यश आले, ही समाधानाची बाब आहे.
उपायुक्त सरदेशपांडे म्हणाले, मिळालेल्या तपशिलांच्या आधारे भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्परतेने त्या व्यक्तिचे घर शोधले आणि त्यांचे समुपदेशन केले. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय बदलला. किरण साळी म्हणाले, संबंधित व्यक्ती पूर्वी शहराच्या मध्यभागात राहत होती.  त्यामुळे कार्यकर्त्यांकडे चौकशी केल्यावर तिचा क्रमांक मिळाला. त्या आधारे त्यांचा शोध घेता आला. गणेशोत्सवात एका व्यक्तिचा जीव वाचविण्यात यश आले, ही चांगली गोष्ट आहे. या बद्दल समाधान वाटते. या घटनेबाबत डॉ. गोऱहे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना माहिती दिली तसेच पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांचेही आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com