doctor surgery
sakal
पुणे - बाळाच्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशी त्याला दूध पिताना उलट्या होऊ लागल्या. तपासण्या केल्यावर त्याच्या आतड्यांना जन्मतःच पीळ पडला असल्याचे निदान झाले. यामध्ये आतड्यांना रक्तपुरवठा होत नसल्याने ते सडण्याचा धोका निर्माण होतो. याला वैद्यकीय भाषेत ‘इंटेस्टाइनल मॅलरोटेशन विथ मिडगट व्हॉल्व्युलस’ असे म्हणतात. ही दुर्मीळ स्थिती असते.
त्यावर वेळेत उपचार न झाल्यास काही तासांतच बाळावर जीवघेणा प्रसंग ओढवू शकतो. बाणेरमधील मणिपाल रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने या नवजात अर्भकावर शस्त्रक्रिया केल्याने त्याचे प्राण वाचले.