राज्यभर हलका पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Light rain across Maharashtra state

राज्यभर हलका पाऊस

पुणे - राज्यात जोरदार बरसणाऱ्या काहीशी उसंत घेतली आहे. राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते जोरदार पाऊस पडत आहे. शनिवारी (ता. १६) सकाळपर्यंत कोकणासह घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली.

मॉन्सून सक्रिय असल्याने राज्याच्या विविध भागांत दमदार पावसाने हजेरी लावली. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर संततधार पाऊस पडला. काही ठिकाणी जोरदार सरी बरसत होत्या. शनिवारी (ता.१६) राज्यात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असून, सूर्यदर्शन झाले.

पावसाचा जोर ओसरणार

कोकण, राज्यातील अनेक भागांत रविवारी (ता. १७) पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे. तर कोकणासह मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गुजरातच्या किनाऱ्यावरील कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकणार आहे. मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्याचे संकेत आहेत.

मराठवाड्यात उघडीप

मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील तालुक्यात पावसाचा रिपरिप सुरू होती. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू असल्याने पाणीसाठा वाढला आहे. मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली, तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

Web Title: Light Rain Across Maharashtra State

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top