Pune Weather: पुण्यात पावसाने घेतली दोन दिवसांची विश्रांती; पुढील दोन दिवसांत पुन्हा हलक्या सरींचा अंदाज
Pune Rain Update: पुण्यात पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रविवारी आकाश ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडेल.
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तर पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.