लग्न किंवा घरगुती कार्यक्रम करताय? जाणून घ्या, पुणे जिल्ह्यातील नवी नियामवली

डी.के.वळसे पाटील
Saturday, 28 November 2020

“सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे समजून लग्न समारंभात गर्दी, मिरवणुका वाढत चालल्या आहेत. सोशल डीस्टनसचा बोजवारा उडाला आहे. विशेषतः तरुण पिढी नियमाची पायमल्ली करत असल्याचे ठिकठिकाणी आढळून आले आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास हि साथ आटोक्यात आणणे हि प्रशासनाची डोकेदुखी ठरू शकते.

मंचर(पुणे) : “पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लग्न समारंभ व घरगुती कार्यक्रमामध्ये ५० पेक्षा जास्त लोकांनी सहभागी होवू नये. नियमापेक्षा अधिक लोक आढळून आल्यास व अन्य नियमांचा भंग केल्यास संबधिताच्या विरोधात दंडात्मक कार्यवाही केली जाईल.” असा इशारा देणारे पत्रक पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी शुक्रवारी (ता.२७) प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकाच्या प्रती सर्व पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

“सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे समजून लग्न समारंभात गर्दी, मिरवणुका वाढत चालल्या आहेत. सोशल डीस्टनसचा बोजवारा उडाला आहे. विशेषतः तरुण पिढी नियमाची पायमल्ली करत असल्याचे ठिकठिकाणी आढळून आले आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास हि साथ आटोक्यात आणणे हि प्रशासनाची डोकेदुखी ठरू शकते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी शुक्रवार (ता.२७) रोजी पत्रक जारी केले आहे. लग्न समारंभ व घरगुती कार्यक्रमामध्ये लोक मोठ्या संख्येने सामील होत आहेत. सोशल डीस्टनस नियम पाळले जात नाहीत. कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येवू नये. हॉटेल व्यवसायिक व मंगल कार्यालय मालकांनी सदरचे पत्रकामध्ये दिलेल्या सूचना व अटीचे पालन करावे. लग्न व इतर समारंभासाठी येणाऱ्या लोकांची यादी कार्य मालकांनी ठेवावी. कायद्याचे उल्लघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.” असे पत्रकात नमूद केले आहे.

दरम्यान, लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमात नियम पाळले जातात किंवा नाही याची पाहणी पोलीस पथकामार्फत अचानक भेटी देवून केली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे यापुढे लग्न समारंभ साजरे करताना. गर्दी होणार नाही. याची काळजी वधू व वर कुटुंबियांना घ्यावी लागणार आहे.

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची रंगीत तालीम पूर्ण; दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Limit of 50 people in wedding ceremonies and house programs in Pune District