

लिंग्या घाटात निसर्गसौंदर्याचा आविष्कार
धोंडिबा कुंभार : सकाळ वृत्तसेवा
पिरंगुट, ता. १४ : मोसे खोऱ्यातील लवासा (ता. मुळशी) परिसरात असलेले धामण ओहोळ हे पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक. रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमारेषेवर लिंग्या घाटातील निसर्ग आणि तेथील धबधबा अनुभवणे म्हणजे साक्षात तांडवनृत्याचा आविष्कार. येथील धबधबा आणि बॉम्बे पॉइंट म्हणजे पर्यटकांसह गडप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी मेजवानी ठरते.
पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक हजेरी लावत आहेत.
आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा पाऊस, ढगांशी लपंडाव खेळणारी सह्याद्रीची रांग, घाटावरची बोचरी हवा, कारवीत बुजलेल्या वाटा आणि फेसाळणाऱ्या आणि अतिवेगाने कोसळणाऱ्या धबधब्याच्या धारा म्हणजे आनंदाचा सोहळाच. ऐतिहासिक स्पर्श असलेला इथला निसर्ग, घाट आणि ट्रेकिंगचा संगम म्हणजे अनुपम सौंदर्याचा मिलाफ म्हणता येईल.
पर्यटनामुळे स्थानिक हॉटेल्स, खाद्यव्यावसायिक, मार्गदर्शक व स्थानिक विक्रेत्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सध्या सहा ते सात मार्गदर्शक काम पाहतात. मुख्य समस्या व आव्हाने - धामण ओहोळ ते धबधबा हे अंतर पार करण्यासाठी पायी प्रवास करावा लागतो.
आवर्जून पहावीत अशी पर्यटन स्थळे
लिंग्या सुळका
सोमजीबाबा समाधी मंदिर
बॉम्बे पॉइंट, कोकण कडा
वीर बाजी पासलकर वाडा
कुर्डुगड, काळू व्हॅली धबधबा
वाघजाई मंदिर
पावसामुळे ओढ्याचे पाणी कमी जास्त होते. धबधब्याजवळील दगड गुळगुळीत व निसरडे झाल्याने सावकाश चालावे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यास धबधब्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. सेल्फी किंवा फोटो काढताना धोकादायक ठिकाणी जाऊ नये.
- वेदांत पासलकर, स्थानिक तरुणण
लिंग्या घाटातून कोसळळारा मनोहारी धबधबा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.