
आंदगाव (ता. मुळशी) येथे अनेक वर्षा पासून सुरू असलेले अनाधिकृत दारू विक्रीचे व्यावसाय गावातील महिलांच्या पुढाकाराने बंद करण्यात आले.
महिलांनी केली आंदगाव येथे दारू बंदी
भुकूम - आंदगाव (ता. मुळशी) येथे अनेक वर्षा पासून सुरू असलेले अनाधिकृत दारू विक्रीचे व्यावसाय गावातील महिलांच्या पुढाकाराने बंद करण्यात आले. ग्रामसभा घेऊन पेलिसांच्या सहकार्याने महिलांनी ही कार्यवाही केली.
येथील ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफ्फुल्ल मारणे, उपसरपंच शिवाजी झुंझुरके यांना सांगितले की, गावामध्ये अकरा ठिकाणी अनाधिकृतपणे दारू विक्री होत असे. दारूमुळे गावातील तरूण पिढी व्यसनाधिन होऊ लागली होती. अनेकांच्या प्रपंच अडचणीत आले, दारूमुळे कुटूंबात दररोजचे वाद, भांडणे होत असत. त्याचा परिणाम घरातील लहान मुलांवर होत असे. तसेच गाव येथील उच्च दर्जाच्या हायस्कूलमुळे शिक्षणासाठी तालुक्यात प्रसिध्द आहे. शाळेच्या परिसरातही काही जणांनी दारू विक्रीचे व्यवसाय सुरू केला होता. गावातील महिला सविता मारणे यांना पुढाकार घेऊन महिलांना संघटीत केले.
29 आँगस्ट रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक यांची महिलांनी भेट घेऊन दारूबंदीची मागणी केली. त्याच्या मार्गदर्शनाने शुक्रवार दिनांक 16 सप्टेबर रोजी महिलांनी ग्रामसभा बोलली. यावेळी पौड पोलिस स्टेशनचे उपपोलिस निरिक्षक श्रीकांत जाधव, बिट अंमलदार रविंद्र नागटिळक ग्रामसभेस उपस्थित राहिले. गावातील सतरा जणांची दारूबंदी कमिटी तयार करण्यात आली. शिवाजी मारणे अध्यक्ष, सविता मारणे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. गावातील सर्व दारू विक्री व्यावसाय बंद करण्यात आले. तसेच यापुढे कोणी दारू विक्रीचा प्रयत्न केल्यास त्यार कडक कारवाईचे ठरले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व महिला मोठ्या प्रमाणार उपस्थित होत्या.