'दारू विक्रेत्यांनो, 'या' नियमांचे पालन करा नाहीतर...'; जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय इशारा!

Liquor-Sellers
Liquor-Sellers
Updated on

पुणे : सूचनांचे पालन न करणाऱ्या आणि गर्दीवर नियंत्रण राहत नसल्याचे निदर्शनास आल्यास मद्य विक्री करणाऱ्या त्या दुकानाचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.

मद्य विक्रेत्यांकडून आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. परंतु काही ठिकाणी तसे होताना दिसत नाही. मद्य विक्रीस परवानगी देताना घातलेल्या अटी व शर्ती व्यतिरिक्त साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी अटी- शर्तींचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

काय आहेत अटी शर्ती : 

1. प्रत्येक परवानाधारकाने किमान दोन नोकरांकडून दुकानासमोर ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागणार नाही, याची खातरजमा करावी.

2. ग्राहकांची संख्या 30 वर जात असल्यास प्रत्येक ग्राहकांस विशिष्ट तारीख व वेळ नमूद करुन त्या निश्चित वेळी मद्य खरेदीस येण्याबाबत दुकानाचा शिक्का, तारीख, वेळ आणि ग्राहकाचा क्रमांक नमुद करुन एक कागदी टोकन देण्यात यावे.

3. सकाळी दहा ते दोन या वेळेत पांढऱ्या रंगाचे व दुपारच्या 2 ते 5 या वेळेत पिवळ्या रंगाचे कागदी टोकन द्यावे.

4. ग्राहकांना कागदी टोकन देण्यास सुरुवात झाल्यानंतर ग्राहकांची पुन्हा रांग लागणार नाही. त्यांना त्वरीत मद्य देण्यात यावे. दुकानातील नोकरांची संख्या चार पेक्षा जास्त वाढणार नाही, तसेच त्यांनी मास्क वापरावा.

5. मास्क न वापरणाऱ्या ग्राहकाला मद्य विक्री करण्यात येऊ नये. अशा ग्राहकांना टोकन देऊ नये, तसेच रांगेत उभे राहू देऊ नये.

6. एका दुकानासमोर जास्तीत जास्त 50 पेक्षा जास्त ग्राहकांची रांग राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

7. प्रत्येक परवाना धारकाने ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी  पाच फुटांच्या अंतरावर चौकोन आखून त्यावर ग्राहकांनी उभे राहुन अंतराचे पालन होईल, याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Treasury Officer Suffers Heart Attack In Manchar Doctors Timely Treatment Helps Save His Life After Severe Chest Pain
Maharashtra Board SSC HSC Exam 2027 Check Class 10 and 12 Written Exam Dates Practical Exams and Internal Assessment
Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Marathi News Esakal
www.esakal.com