पुणे : 'या' भागातील दारुची दुकाने राहणार बंद; जिल्हा प्रशासनाचा निर्णय

अनिल सावळे 
बुधवार, 6 मे 2020

जवळपास सव्वा महिन्यानंतर मद्य विक्रीची दुकाने सुरू झाली. त्यामुळे पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मद्य खरेदीसाठी लांबवर रांगा लावल्या होत्या.

पुणे : कोरोना बाधित कंटेनमेंट झोनमधील (संक्रमणशील क्षेत्र) ग्राहक जवळच्या अंतरावर सुरू असलेल्या वाईन शॉपमध्ये जाऊन मद्य खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे आता कंटेनमेंट झोनच्या बाहेरील पाचशे मीटर अंतरावरील मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी (ता.६) दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंटेनमेंट झोन वगळता मद्य विक्री सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पुणे ग्रामीण परिसरातील सुमारे 702 ठिकाणी मद्य विक्री सुरू करण्यात आली. त्यात वाईन शॉप, देशी दारु आणि बियर शॉपी यांचा समावेश आहे.

- लॉकडाउनमध्येही बँकांच्या शेअरमध्ये आली तेजी; बाजारात घसरणीला लागला 'ब्रेक'!

जवळपास सव्वा महिन्यानंतर मद्य विक्रीची दुकाने सुरू झाली. त्यामुळे पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मद्य खरेदीसाठी लांबवर रांगा लावल्या होत्या. तसेच, कंटेनमेंट झोनमधील काही ग्राहक जवळच्या अंतरावर असलेल्या परिसरात जाऊन मद्य खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कंटेनमेंट झोनच्या पाचशे मीटर अंतरावर दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसलेल्या ठिकाणी कठोर धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. नियमाचे पालन न करणाऱ्या मद्य विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.

- लॉकडाउनमुळे पडलाय बेरोजगारीचा 'टॉप गिअर'; भारतातील बेरोजगारीचा दर पोहोचला...!

गर्दी होणाऱ्या दुकानांमध्ये टोकन पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. 50 पेक्षा अधिक ग्राहक असल्यास विक्रेत्यांनी ग्राहकांना टोकन देऊन त्यानुसार वेळेत विक्री करावी. विक्रेते आणि ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करावा.
- संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग.

राज्य सरकारच्या नवीन भरती न करण्याच्या आदेशाचा विद्यार्थ्यांना झटका

सध्या सुरू असलेली दुकाने : (वाईन शॉप, देशी दारू, बियर शॉपी)
पुणे शहर - 250 
पिंपरी-चिंचवड - 213
कॅन्टोन्मेंट बोर्ड - 18 
पुणे ग्रामीण - 221 
एकूण - 702 दुकाने

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: close liquor shops of 500 meters outside the containment zone ordered Pune District Collector