मराठीच्या रक्षणाचे आमचे साहित्य वेगळे

राज ठाकरे; पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्काराचे वितरण
Raj Thakeray
Raj Thakerayesakal
Updated on

पुणे: आम्ही देखील साहित्य प्रेमी आहे, परंतु आमची साहित्ये जरा वेगळी आहेत. तुमची साहित्य वाचण्यासाठी असतात. आमची न परवडणारी असतात. मराठी साहित्यात असे योगदान आम्ही देऊ शकत नाही, पण मराठीच्या रक्षणासाठी आमची ही साहित्ये नेहमीच तयार आहेत, अशी मिस्कील टोलेबाजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

Raj Thakeray
Pune Corporation Election: निवडणुकीची सूत्रे राजेश पांडे यांच्याकडे

नवी पेठेतील एस.एम.जोशी सभागृहात पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार सोहळ्यात ठाकरे बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, कार्याध्यक्ष संजय जोशी, सौरभ गाडगीळ आदी उपस्थित होते. यावेळी दाजीकाका गाडगीळ स्मरणार्थ पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार ‘दीपावली’ दिवाळी अंकाला प्रदान करण्यात आला. संपादक अशोक कोठावळे यांनी तो स्वीकारला. तसेच दिवाळी अंकातील उत्कृष्ट वैचारिक लेखन पुरस्कार विश्वास पाटील, कथेसाठी संतोष वरधाव, कवितेसाठी किशोर कदम यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठाकरे म्हणाले, ‘‘आपल्या भाषेबद्दल आपण आग्रही असायला हवे. दक्षिणेतील इंग्रजी भाषेत शिकणाऱ्या मुलांचे पालकही त्यांच्या मातृभाषेचा अभिमान आहे. महाराष्ट्रातही साहित्यिकांनी या समाजावर संस्कार करावे. मराठीबद्दल समाजाची ओढ वाढवावी, ती वृद्धिंगत करावी.’’

Raj Thakeray
Pune Corporation Election: निवडणुकीची सूत्रे राजेश पांडे यांच्याकडे

लॉकडाउनमुळे झालेल्या सांस्कृतिक उपवासाचे पारणं अशा रसरशीत कार्यक्रमाने होत असल्याची भावना व्यक्त करत डॉ. ढेरे म्हणाल्या,‘‘दिवाळी अंकांचे कुतूहल आणि प्रभाव कमी होतो का काय अशी स्थिती होती. सुरवाती पासूनच लोकांच्या मनाची पकड घेणारे दिवाळी अंकात तालेवार लेखक भेटायचे. दिवाळी अंकामुळे लेखकांबरोबरच उत्तम संपादकांची फळी निर्माण झाली. मराठी ललित गद्य दिवाळी अंकातून प्रतिष्ठित झाले. मराठीच्या अभिरुचीची घडण वाचकांनी केली आणि त्यांची ऋची दिवाळी अंकातून उभी राहिली. या पुरस्कारामुळे मराठी सृजनशीलतेचा सन्मान झाला आहे.’’

पहिले व्यंगचित्र मार्मिकमध्ये..

माझ्या व्यंग्यचित्राची सुरवात मार्मिकच्या दिवाळी अंकातून झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले. आजच्या आईवडिलांनीही मुलांना दिवाळी अंक वाचायला लावलं पाहिजे. समाजमाध्यमांमुळे आज सर्वच लोक गोंधळे असली तरी दिवाळी अंकाचे वेगळेपण आहे. दिवाळी अंकामुळे वाचनाची आवड आणि जिभेला वळण लागले आहे, असेही ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com