
Liver Transplant Case
Sakal
पुणे : यकृत प्रत्यारोपणादरम्यान दांपत्याच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या चौकशी समितीने डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयाला गुरुवारी भेट देऊन कागदपत्रांची व रुग्णालयाची चौकशी केली. जागतिक कीर्तीचे यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. मोहम्मद रेला यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून, डॉ. रेला व इतर तज्ज्ञांनी ही भेट दिली.