esakal | हातावरचे पोट असलेल्यांचा संसार येणार रूळावर 
sakal

बोलून बातमी शोधा

kothrud.jpg

बाधित क्षेत्र (कंटेन्मेट झोन) वगळून पुणे शहरातील इतर भागात जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे छोट्या व मोठ्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

हातावरचे पोट असलेल्यांचा संसार येणार रूळावर 

sakal_logo
By
जितेंद्र मैड

कोथरूड (पुणे) : लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात बाधित क्षेत्र (कंटेन्मेट झोन) वगळून पुणे शहरातील इतर भागात जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे छोट्या व मोठ्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. दुकान सुरू झाले आणि त्यांच्या जगण्याला काडीचा आधार मिळाला. लॉकडाउनमुळे दुकानं बंद असल्याने हातावर पोट असलेल्यांचा संसार कोलमडण्याच्या मार्गावर होता. 

....म्हणून यूपीतील चित्रकुट येथील महिलेने पुणेकरांचे मानले आभार

लॉकडाउनमधील अनुभवांबाबत नवभूमी चौकात गेली दहाबारा वर्षे चप्पल दुरुस्तीचे काम करणारे गणपत अवसरे म्हणाले की, वडील ऐंशी वर्षाचे तर आई पंच्याहत्तर वर्षाची आहे. मी आणि माझी बायको असे माझे कुटुंब इथे राहतो. मुलगा आहे पण तो वेगळा राहतो. त्याचेही काम बंद आहे. या बंदच्या काळात कोणी आम्हाला काहीही दिले नाही. तीन दिवस ठेचा खाऊन दिवस काढले. रेशनवर गहू, तांदूळ मिळाले. पण मीठ, तेल लागतेच की. त्यासाठी पैसे कुठून आणायचे. बायको धुण्याभांड्याच्या कामाला जायची. तिचे कामही बंद होते. कसं जगावं हा प्रश्न होता. आता दुकान चालू झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्‍न मार्गी लागली आहे. 

पुण्यातील ८० वर्षांच्या आजीबाई जिंकल्या कोरोना विरूध्दची लढाई

वयाची पासष्टी ओलांडलेले मच्छिंद्रनाथ फलटणकर यांचे कोथरूड कचरा डेपो समोर पिशव्या दुरुस्तीचे दुकान आहे. गेली पंधरा वर्षे त्यांची टपरी येथे आहे. फलटणकर म्हणाले की, मी रोज एका डब्यात पाच दहा रुपयाची नाणी टाकायचो. तीच माझी बचत होती. लॉकडाउनमुळे जेवढे पैसे साठवले होते तेवढे सगळे संपले. दोन दिवसापासून दुकान सुरू केले आहे. उपजीविकेसाठी दुसरे काहीही साधन नाही. दोन चार रुपये मिळतील या आशेने रोज येतो. पत्नी दीड वर्षे कॅन्सरने आजारी आहे. पण काय करणार. मुलगा मुंबईला अडकला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

तर दत्तात्रेय गांडले, वय 47 यांचे नंबर प्लेट टाकण्याचे दुकान कोथरूड कचरा डेपो समोर आहे. दोन महिने दुकान बंद ठेवले पण आता येथून पुढे दुकान बंद ठेवण्याची आमची ताकद नाही. उदरनिर्वाहासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही. सोशल डिस्टन्स ठेवून आम्ही आमचे दुकान चालवू.  

loading image