पुण्यातील एेंशी वर्षांच्या आजीबाई जिंकल्या कोरोना विरूध्दची लढाई

राजेंद्रकृष्ण कापसे
Tuesday, 19 May 2020

कोरोनाच्या भीतीने अनेकजण धास्तावले असताना हवेली तालुक्यातील खानापूरच्या ८० वर्षाच्या आजीने कोरोनाला हरवले आहे.

खडकवासला (पुणे)  : कोरोनाच्या भीतीने अनेकजण धास्तावले असताना हवेली तालुक्यातील खानापूरच्या ८० वर्षाच्या आजीने कोरोनाला हरवले आहे. कोरोना विरूध्दची लढाई जिंकून आजी घरी परतल्या आहेत.

पुण्यात एका आयटीतील कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग 

महापालिकेचा आरोग्य विभागातील कर्मचारी व खानापूरचे रहिवाशी असलेल्या 52 वर्षाच्या व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होती. त्यांच्या घरातील 14 लोकांच्या तपासणीत आठजण पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये 80 वर्षाच्या आजी पालिका कर्मचाऱ्याची आई आहेत. त्यांचे वय, त्यांना रक्‍तदाब नियंत्रित ठेवण्याची गोळी घेतात. अशातच त्यांना कोरोना झाला. उपचार सुरू असताना जेवण जात नसल्याने अशक्तपणा जाणवला. त्यामुळे, घरातील सर्व जण चिंतेत होते. पण आजी मन घट्ट करून खंबीरपणे कोरोनाविरुद्ध लढल्या.

पुण्यात ग्रीन झोनमध्ये असा पसरू शकतो कोरोना; काळजी घ्यावीच लागणार!

घरी आल्यावर भरलेले घर पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. साखर भरवून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्या थेट देवघरात गेल्या अन् देवाचे दर्शन घेत त्यांनी देवाचे मनोमन आभार मानले. रुग्णालयातील जेवण जात नसल्याने त्यांना अशक्तपणा होता। सलाईन लावावे लागले. नातेवाईक तेथेच उपचार घेत होते. त्यांनी समजावून सांगितल्याने त्या जेवण घेऊ लागल्या. त्यांची तब्बेत सुधारत गेली अन अखेर त्या घरी आल्या. 

मूर्खपणाचा कहर! चक्क पिण्याच्या पाण्याच्या टाकीत ते करतायेत आंघोळ

लॉकडाऊनच्या अगोदर दोन मजले चढणे- उतरणे, दीड किलोमीटर चालणे, जमेल तसे घरकामात मदत करणे असा रोजचा दिनक्रम होता. वरण-भात, भाजी- भाकरी व दूध असा त्यांच्या आहार आहे. त्या घरात कारभारी असताना घरकाम उरकून, वीस म्हशींची देखभाल व शेतात जाणं अशी कष्टाची कामे केलेली आहेत. त्यांचे माहेर धरणाच्या पलीकडील आहे. त्यामुळे, शेतकरी कुटुंब असल्याने खंबीर राहत वयाच्या ऐंशीव्या वर्षी खंबीरपणा रहात कोरोनावर यशस्वी मात केली याचं कौतुक होत आहे. त्यांना दोन मुलगे, दोन मुली आहेत मोठी मुलीचं वय सध्या 60 आहे त्यामुळे, यांचे वय 80 आहे. असे सरपंच निलेश जावळकर यांनी सांगितले. "अंगात मावळीपणा, सहन करण्याची ताकद जास्त आहे. हे मूळचा अंगात खंबीरपणे आहे. त्याच जोरावर त्यांनी ही लढाई जिंकल्याचा दावा." पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन वाघ यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 80 years old woman fight with corona