Cows brought for sale at the sub-market committee yard in Alephata on Thursday.
sakal
- राजेश कणसे
आळेफाटा - जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात गुरुवारी (ता. १९) गाईंची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. एकाच दिवसात ४२५ गाईंची आवक झाली असून, त्यापैकी ३८३ गाईंची विक्री झाली. या खरेदी-विक्रीतून सुमारे ८४ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व जुन्नरमधील गावांमध्ये शासनाने तातडीने चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.