अपेक्षा न ठेवता जगल्याने भाग्यवान ठरलो - श्रीराम रानडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

‘माझ्या वाट्याला आले, ते आयुष्य मी जगत गेलो. मी भाग्यवान ठरलो, कारण मी कशाचीही अपेक्षा न ठेवता जगू शकलो,’’ अशी भावना ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे यांनी नुकतीच व्यक्त केली.

पुणे - ‘माझ्या वाट्याला आले, ते आयुष्य मी जगत गेलो. मी भाग्यवान ठरलो, कारण मी कशाचीही अपेक्षा न ठेवता जगू शकलो,’’ अशी भावना ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे यांनी नुकतीच व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रसिद्ध सनदी लेखापाल आणि अर्थविषयक लेखक मिलिंद संगोराम यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणारा पुरस्कार रानडे यांनी लिहिलेल्या ‘रमलो मी’ या पुस्तकाला प्रसिद्ध कलावंत आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते नुकताच देण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.

रानडे म्हणाले, की मी जगण्याकडून फार अपेक्षा ठेवल्या नाहीत. शिक्षकी पेशा ज्या आत्मीयतेने केला, त्याच प्रेमाने रंगमंच आणि चित्रपटात भूमिकाही केल्या, त्यामुळे मला खूप शिकायला मिळाले. मिलिंद संगोराम हे राजहंस प्रकाशनाच्या परिवाराचे सदस्य होते, त्यामुळे या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकास हा पुरस्कार दिला जातो. यानिमित्त प्रभावळकर आणि रानडे यांनी एकमेकांशी मुक्त संवाद साधला. 

राजहंस प्रकाशनचे संचालक दिलीप माजगावकर म्हणाले, की श्रीराम रानडे वखवखशून्य आयुष्य जगले. तीच त्यांची कमाई आणि पुण्याई आहे. ज्या क्षेत्रात आपण फारशी गती मिळवू शकत नाही, तेथून ते पाऊलही न वाजवता बाहेर पडले आणि स्वतःच्या आवडीतच रममाण झाले. डॉ. अपूर्वा संगोराम यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे उपस्थित होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Living without expectations made me lucky shriram ranade