

LLB Course Attracts Youth
Sakal
पुणे : राज्यात तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांमध्ये २२ ते २५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या वयोगटातील जवळपास पाच हजार ३४२ विद्यार्थ्यांनी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतला आहे. गेल्या तीन वर्षांत प्रवेश घेणाऱ्यांमध्ये याच वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर ५५ ते ६० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकही विधी अभ्यासक्रम करण्याला पसंती देत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.