लष्कराचा अश्रयात वसलेले 'दामतेंग'

एलएसीजवळ असलेले 'झिरो नेटवर्क झोन'मधील गाव
loc zero network zone india china border damteng village population of 120 to 150 people
loc zero network zone india china border damteng village population of 120 to 150 peoplesakal
Updated on

दामतेंग : भारत चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) जवळ असलेल्या दामतेंग या गावाला लष्कराचे आश्रय मिळाले आहे. अत्यंत कमी लोकसंख्या आणि सोईसुविधांचे अभाव असलेल्या या गावाचा सांभाळ लष्कराद्वारे केला जात आहे. दामतेंग ही केवळ १२० ते १५० लोकांची वस्ती आहे. येथे पक्के रस्ते नसून संपर्क करण्यासाठीची सर्वसाधारण सुविधा देखील उपलब्ध नाही. त्यामुळे या परिसराला 'झिरो नेटवर्क झोन' असे म्हणले जाते. इंटरनेट या गावापर्यंत पोहचलेले नाही. मात्र लष्कराकडून येथील प्रत्येकाची काळजी घेतली जात आहे.

अत्यंत दुर्गम भाग असलेल्या या गावात विकासकामे करण्याची मोठी गरज आहे. सीमा रस्ते संघटना (बीआरओ) किंवा लष्करातर्फे केले जाणारे प्रकल्पांमुळे या स्थानिकांना रोजगार मिळत आहे. तर यातील एखाद दुसरे कुटुंब आपले छोटे दुकान चालवत आहे. उर्वरित सर्व रोजंदारीवर काम करत उत्पन्न मिळवत आहेत. या स्थानिकांसाठी आरोग्य सुविधा, शिबिर, तपासणी, अन्नधान्य पुरवठा अशा सर्व गोष्टी लष्करातर्फे मोफत पुरविल्या जातात. त्यामुळे स्थानिक लोक आणि सैन्यामध्ये एक वेगळंच नात या गावात पाहायला मिळते.

याबाबत येथील स्थानिक ल्हाम सेरिंग म्हणले, " या भागात आमच्या सगळ्या अडचणी लष्कर दूर करतात. मी स्वतः येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात रोजंदारीवर काम करत आहे. तसेच लष्कराचे ही काही छोटे मोठे विकास काम असल्यास ते करतो. त्यामुळे त्यांच्याकडून पैसे ही मिळतात. जर कोणाला गंभीर आरोग्याची समस्या उद्भवली तर लष्कर आम्हाला वाहनांची सुविधा तत्काळ उपलब्ध करून देतात."

अनोखे 'हॉट वॉटर स्प्रिंग' आकर्षणाचे केंद्र

चीनमधून उगम होणारी नदी दामतेंगमध्ये ही वाहते. दामतेंग येथे या नदीला 'शौचू' असे नाव देण्यात आले असून नदीच्याकाठी एक 'हॉट वॉटर स्प्रिंग' म्हणजेच गरम पाण्याचा झरा आहे. हे या परिसरातील सर्वात आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. विशेष म्हणजे बारा महिने येथे गरम पाणी येत असून या मागचे विज्ञानिक कारण अद्याप समजलेले नाही. मात्र या पाण्यामध्ये औषधी गुण असून यामुळे आजार आणि दुखणे बरे होत असल्याचे येथील स्थानिकांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com