पुणे - 'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकट्याने लढायच्या कि काही लोकांना बरोबर घेऊन लढायच्या याचा विचार, जिल्ह्यांमधील नेतृत्वाला विश्वासात घेऊन ठरविले जाईल. तसे केल्यास आणखी नव्या नेतृत्वाची फळी प्रत्येक जिल्ह्यात तयार होईल. पुढील तीन महिने तुमचे आहेत, तुमच्या भागात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवीन नेतृत्व कसे आणायचे? ५० टक्के महिलांच्या जागेत कर्तृत्ववान महिलांना पुढे कसे आणायचे? याचा विचार तुम्ही करा.