
पुणे व अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या या अट्टल दरोडेखोरांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणला यश आले आहे.
आळेफाटा (पुणे) : पुणे व अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आळेफाटा पोलिस स्टेशनला ता. १४ डिसेंबर २०२० रोजी एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता गुन्ह्यातील आरोपींचा त्वरित शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. पुणे व अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या या अट्टल दरोडेखोरांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणला यश आले आहे.
पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
आरोपींची माहिती घेण्यासाठी आळेफाटा, पारनेर, निघोज, साकोरी या भागात शोध सुरू केला असता बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिरूर पोलिस स्टेशन गु.र.नं.७४८/२०१९भा.द.वी कलम ३९५ मधील फरार आरोपीची नामे विशाल उर्फ कोंग्या काळेअसून हा टाकळी हाजी परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार निघोज बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून थांबलो असता दोन इसम निघोज बाजूकडे जाताना दिसले. त्यांना पोलिसांचा संशय आल्याने ते पळून जात असल्यास सदर इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
त्यांचे नाव व पत्ता १) विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे (वय २६ ) रा. निघोज ता.पारनेर जि.अ.नगर, २) दिपक उर्फ आशिक आझाद काळे (वय२५) रा. निघोज ता. पारनेर जि.अ नगर असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मागील चार पाच महिन्यात ओतूर, आळेफाटा, मंचर लोणीकंद, पारनेर या भागात त्यांचे इतर साथीदारांसोबत गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पोलिस स्टेशनकडून माहिती घेतली असता त्यांनी आळेफाटा पोलिस स्टेशन, ओतुर पोलिस स्टेशन, मंचर पोलिस स्टेशन, लोणिकंद पोलिस स्टेशन, पारनेर पोलिस स्टेशन, बेलवंडी पोलिस स्टेशन व शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेताजी गंधारे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलिस हवालदार विक्रम तापकीर, काशीनाथ राजापूरे, दिपक साबळे, अजित भुजबळ, मंगेश थीगळे, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. तसेच यासाठी आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांचेही सहकार्य लाभले.