वेगात निघालेल्या कारचा केला पाठलाग, तपासणी करताच सापडले...

रवींद्र पाटे
Wednesday, 28 October 2020

देशी-विदेशी दारु व मोटार असा ५ लाख २० हजार ५०४ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई हिवरे तर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथे मंगळवारी(ता.२७) दुपारी करण्यात आली.

नारायणगाव - बेकायदेशीर देशी-विदेशी दारूची वाहतुक केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना अटक केली असून आरोपींकडून  देशी-विदेशी दारु व मोटार असा ५ लाख २० हजार ५०४ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई हिवरे तर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथे मंगळवारी(ता.२७) दुपारी करण्यात आली.

या प्रकरणी निलेश बबन पळसकर (वय ३६ ),अरुण कुमार रामप्रसाद राय यादव (वय३० दोघेही राहणार जांबुत, ता. शिरूर, जि. पुणे) अशी माहीती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डी. के.गुंड यांनी दिली.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलीस अधीक्षक( पुणे ग्रामीण )यांनी अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्या नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी नारायणगाव  पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नारायणगाव-खोडद रस्त्याने स्विफ्ट मोटार( एमएच१३ एलपी.९९९६) भरधाव वेगात खोडद बाजुकडे जाताना दिसली. पथकाने पाठलाग करून हिवरे तर्फे नारायणगाव येथे गाडीला अडवले. तपासणी केली असता गाडीमध्ये ४५ हजार ५०४ रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.मोटारीसह  ५ लाख २० हजार ५०४ किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस हवालदार शरद बांबळे, दीपक साबळे यांचे पथकाने केली.आरोपींविरुद्ध नारायणगाव पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई), ६७ (क) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Local crime branch team arrests two for smuggling domestic & foreign liquor