Vidhan Sabha 2019 : टिळेकरांच्या प्रचारासाठी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन होत असलेल्या सुसूत्र नियोजनामुळे महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. उमेदवारी मिळवण्यापासून यश मिळवण्यासाठी त्यांच्याकडून व्यक्त होणाऱ्या आत्मविश्वासाने तरूण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यातील प्रत्येकाकडून स्थानिक पातळीवर घरटी प्रचार यंत्रणा राबवली जात आहे.

मांजरी : कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन होत असलेल्या सुसूत्र नियोजनामुळे महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. उमेदवारी मिळवण्यापासून यश मिळवण्यासाठी त्यांच्याकडून व्यक्त होणाऱ्या आत्मविश्वासाने तरूण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यातील प्रत्येकाकडून स्थानिक पातळीवर घरटी प्रचार यंत्रणा राबवली जात आहे.

भाजपसह शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती या महायुतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणूक रणनिती ठरविली जात आहे. आज दसऱ्याच्या निमित्ताने उमेदवार आमदार टिळेकर यांनी हडपसर मतदार संघातील ठिकठिकाणच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन पुढील प्रचाराची दिशा ठरविली आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे.

दरम्यान, उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांनी प्रभाग क्रमांक 26 मधील महंमदवाडी, तरवडे वस्ती, सय्यद नगर, साठे नगर, सातव नगर आदी भागात पदयात्रा काढून मतदार, कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या. गेल्या वीस वर्षांपासून येथील प्रलंबित असलेला वाहतूकीचा प्रश्न ससाणेनगर भूयारी मार्गाच्या रूपाने सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न झाल्याबद्दल तसेच राहिलेल्या विकासाला गती देण्यासाठी आम्ही निश्चितपणे आपल्याला मताधिक्य मिळवून देवू, असा विश्वास नगरसेविका प्राची आल्हाट यांनी टिळेकर यांना यावेळी दिला.

नगरसेवक संजय घुले, शिवसेना नगरसेविका प्राची अल्लाट, अतुल तरवडे, स्वाती कुरणे, हनुमंत घुले, विशाल घुले, संकेत घुले, सुनील सातव, संजय सातव, सचिन घुले, शिवराज घुले, पुरुषोत्तम धारवाडकर, प्रमोद कुरणे, प्रमोद सातव, योगेश सूर्यवंशी, अश्विनी सूर्यवंशी बाळासाहेब घुले दादा घुले सुनील धुमाळ संजय घुले महेश घुले मोहन कामठे दत्ता घुले विश्वास पोळ आदी पदयात्रेत सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: local Party workers in hadapsar Vidhansabha Supports Yogesh Tilekar