esakal | लॉकडाऊन सुरुच राहणार; दिलासा नाहीच
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊन सुरुच राहणार; दिलासा नाहीच

- बारामतीत आठ कोरोनाबाधित रुग्ण सापडले

- एका रुग्णाचा मृत्यू

लॉकडाऊन सुरुच राहणार; दिलासा नाहीच

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : केंद्र सरकारकडून दुकाने उघडण्याबाबत सूचना दिल्याबाबत अद्याप माहिती नाही, मात्र बारामती शहर हे संपूर्णपणे प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या पुढील सूचना येईपर्यंत बारामतीत लॉकडाऊन सुरुच राहणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही वृत्तवाहिन्यांकडून आज केंद्र सरकारने दुकाने सुरु करण्यास परवानगी दिल्याच्या बातम्या दाखविल्या गेल्यानंतर बारामतीतील व्यापाऱ्यांकडून याबाबत सकाळपासून चौकशी सुरु झाली होती. मात्र, बारामतीत आठ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे तसेच एका रुग्णाचा मृत्यू झालेला असल्याने बारामती नगरपालिका क्षेत्र रेड झोनमध्ये येत असल्याने पुढील आदेश येईपर्यंत लॉकडाऊन कायमच राहणार असल्याचा खुलासा कांबळे यांनी केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीतील व्यापा-यांनी याबाबत चौकशी केलेली होती, मात्र त्यांनाही कल्पना दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

loading image
go to top