बारामतीकरांनो, 'लॉकडाऊनबाबत वाचा ही महत्त्वाची बातमी'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

- लॉकडाऊनचा प्रस्तावित कालावधी संपेपर्यंत म्हणजे 17 मेपर्यंत तरी बारामतीकरांची लॉकडाऊनमधून सुटका होण्याची शक्यता धूसर.

बारामती : लॉकडाऊनचा प्रस्तावित कालावधी संपेपर्यंत म्हणजे 17 मेपर्यंत तरी बारामतीकरांची लॉकडाऊनमधून सुटका होण्याची शक्यता धूसर आहे. शासकीय नियमानुसार कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर पुढील 21 दिवसापर्यंत नवीन रुग्ण आढळून आला नाही तर तो विभाग ऑरेंज झोनमध्ये सहभागी केला जातो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामतीचा विचार केल्यास 23 एप्रिल रोजी शेवटचा कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्यानंतर 21 दिवस म्हणजे 14 मेपर्यंत जर बारामतीत नव्याने रुग्ण सापडला नाही, तर बारामती ऑरेंज झोनमध्ये येऊ शकते, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने बारामती शहराचा काही भाग प्रतिबंधित आहे, त्यामुळे तेथेही व्यवहार लगेच सुरु करणे अवघड आहे. त्यामुळे बारामतीकरांना तातडीने लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. बारामती एमआयडीसी सुरु करण्याचा निर्णय झाला असला तरी 30 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच कारखाने सुरु करायचे आहेत. त्यामुळे तेथेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते व लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहून तसेच या काळात नवीन रुग्ण सापडला नाही. तर कदाचित बारामतीचे व्यवहार हळूहळू सुरु करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. सध्या तरी लॉकडाऊनच्या नियमांचेच पालन बारामतीकरांनी करायचे आहे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाऊननंतरच्या आराखड्याबाबत काय?

लॉकडाऊननंतर बाजारपेठ सुरु करताना त्याबाबतचा आराखडा कसा असेल, कशा पध्दतीने परवानगी दिली जाईल, त्याच्या नियम व अटी काय असतील याबाबत अगोदरच लोकांना माहिती दिली तर त्यानुसार कार्यवाही करता येईल, असे नागरिकांचे मत आहे. याबाबतचा आराखडा तयार करुन तो प्रसिध्द केल्यास सर्वांना ते सोयीचे ठरेल, असेही नागरिक बोलत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lock Down Remain Continue in Baramati