लॉकडाऊनने हिरावला हॉटेल चालकांच्या तोंडचा घास; अडीच लाख कामगारांचा रोजगार टांगणीला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 July 2020

पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी राज्यभरातील रूम असलेले हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्याचा निर्णय सहा जुलैला राज्य शासनाने घेतला होता. त्यानंतर केवळ जेवण पुरवणारे हॉटेल सुरू होण्याची शक्यता होती. मात्र हॉटेल सुरू झाले तर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. त्यामुळे हॉटेल संघटना, पालकमंत्री आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार होता

पुणे : लॉकडाऊनमुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद असलेला हॉटेल व्यवसाय सुरू होण्याची शक्यता गेल्या आठवड्यात निर्माण झाली होती. मात्र नव्याने लॉकडाऊन सुरू झाल्याने हॉटेल चालकांच्या अगदी तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तर या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगार देखील हवालदिल झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी राज्यभरातील रूम असलेले हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्याचा निर्णय सहा जुलैला राज्य शासनाने घेतला होता. त्यानंतर केवळ जेवण पुरवणारे हॉटेल सुरू होण्याची शक्यता होती. मात्र हॉटेल सुरू झाले तर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. त्यामुळे हॉटेल संघटना, पालकमंत्री आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार होता. मात्र याबाबत चर्चा होऊन हॉटेल पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होण्याआधीच लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे व्यवसाय सुरू होण्याच्या आशेवर असलेल्या रूम असलेले हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस चालकांची प्रतीक्षा वाढली आहे. दरम्यान हॉटेल सुरू होण्याची परवानगी दिल्याने शहरातील अनेक हॉटेल चालकांनी सुरक्षाविषयक बाबीची सर्व तयारी केली होती. हॉटेल सॅनिटाइझ करून किराणा आणि भाजीपाला भरला होता. तसेच कामगारांना देखील बोलावून घेण्यात आले होते. लॉकडाउनमुळे हा सर्व खर्च देखील वाया गेला आहे.

व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने जवळ राहायला असलेल्या कामगारांना हॉटेल व्यवसायिकांनी बोलावून घेतले होते. ग्राहकांना सेवा देण्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी देखील केली होती. मात्र पुन्हा लॉकडाऊन झाल्याने सगळ्यावर पाणी फिरले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार याबाबत आम्हाला उत्सुकता आहे.
गणेश शेट्टी, अध्यक्ष

पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन
पूर्वी ऑनलाइन डिलिव्हरी सुरू होती. लक्ष्मी रोडवरील दुकाने सुरू झाले तेव्हा जरा रुटीन सुरू झाले होते. ग्राहकांना पार्सलची सवय होयला लागली होती. मात्र त्यात पी1 पी2 चा गोंधळ झाला. आता मात्र पूर्ण लॉकडाउन झाल्याने सर्वच पुन्हा ठप्प झाले. आमच्यावर अवलंबून असलेल्या कामगारांची देखील यामुळे निराशा झाली आहे. 
किशोर सरपोतदार, पूना गेस्ट हाऊस

Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!

- किराणा व भाजीपाल्याचा खर्च जाणार वायला 
- कामावर बोलावलेल्या कामगारांचे काय करायचे असा प्रश्न 
- सुमारे अडीच लाख कामगारांचा रोजगार टांगणीला
- व्यवसायिक व कामगारांना दैनंदिन खर्च भागवण्याचे टेन्शन
- लॉकडाउननंतर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याची अपेक्षा
- पी1, पी2 चा पार्सल सेवेवर होतोय परिणाम
[3:50 PM, 7/14/2020] Anil Sawale: लॉकडाऊनमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांकडून खबरदारी

- कोरोनाचा संसर्ग रोखण्यात सोसायटी पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण
- सुरक्षारक्षक आणि हाउसकीपिंगच्या महिलांकडून मास्क, सॅनिटायझरचा वापर
- सोसायटीच्या आवारात निर्जंतुकीकरणावर भर

पुणे, ता. 14 : लॉकडाऊन कालावधीत महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या आदेशांची अंमलबजावणी करताना आणि त्यातच गृहनिर्माण सोसायटीमधील काही दोन-चार सभासदांच्या बेजबाबदारपणामुळे पदाधिकाऱ्यांना सोसायटीचे आरोग्य जपताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 
एखाद्या सोसायटीमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळला चेअरमन, सेक्रेटरीच नव्हे तर सोसायटीतील प्रत्येकाच्या मनात धस्स होत आहे. बाजूच्या सोसायटीत एवढे रुग्ण आढळले, अशी चर्चा सध्या सुरू असते. आपल्या सोसायटीत असे काही घडू नये, यासाठी बहुतांश सोसायट्यांचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर खासगी सुरक्षारक्षकांना आता चोरांपेक्षा कोरोना आत प्रवेश करणार नाही, याबाबत जास्त खबरदारी घ्यावी लागत आहे.
लॉकडाऊनमध्ये यापूर्वी काही प्रमाणात शिथिलता आल्यानंतर गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांमध्ये चैतन्य पसरले होते. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सोसायट्यांमध्ये नियमित व्यवहार सुरू झाले होते. परंतु पुन्हा लॉकडाऊनमुळे सर्व ठप्प झाले आहे. 
-----
गृहनिर्माण सोसायट्यांकडून खबरदारी : 

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  सोसायट्यांकडून प्रवेशद्वारांवर  खबरदारी घेतली जात आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना मास्क बंधनकारक आहे. सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे. काही सोसायट्यांनी थर्मल गन आणि ऑक्सीमिटरची (तपासणी यंत्र) सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
-------
चौकट :
- गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये घरपोच दूध, वृत्तपत्र वितरणाला परवानगी. 
- नवीन भाडेकरूंना प्रवेश बंदी
-  वॉकिंग, जॉगिंगला बंदी 
- सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य 
- जिम आणि स्विमिंग पूलमध्ये प्रवेश बंद
- अन्य शहरातून आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र आणि घरात विलगीकरण करून (होम क्वारंटाइन) राहणे आवश्यक.
-------
कोट : 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यात सोसायट्यांची भूमिका महत्त्वाची आहे. बहुतांश सोसायट्यांकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत, ही बाब समाधानकारक आहे. 
- सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था.
----
कोट :
सोसायटीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. सर्व सभासदांनी पुरेशी खबरदारी घेतल्यास स्वतःच्या कुटुंबाचे आणि सोसायटीचे आरोग्य जपणे शक्य होणार आहे.
- पियुष चौधरी, कोषाध्यक्ष, गगन लॅव्हिश गृहनिर्माण सोसायटी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown affects hotel owners workers employment