esakal | बारामतीकरांचं पण ठरलं, गुरुवारपासून शहरात लॉकडाउन
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

बारामती शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या विचारात बारामती शहरात गुरुवारपासून (ता. 16) लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे.

बारामतीकरांचं पण ठरलं, गुरुवारपासून शहरात लॉकडाउन

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या विचारात बारामती शहरात गुरुवारपासून (ता. 16) लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत बारामतीतील लॉकडाउन सुरुच राहिल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत. 

जुन्नरमधील नागरिकांवर दहा दिवस आहेत ही बंधने 

बारामतीत काल एकाच दिवसात 18 रुग्ण सापडले. आज बारामतीत 5 रुग्ण सापडले. दोन दिवसात 23 रुग्ण सापडल्यानंतर आता ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन जाहिर करण्यात आले आहे. बारामतीतील व्यवहारांवर कालपासूनच दुपारी तीन वाजेपर्यंत निर्बंध आणले होते. आज मात्र लोकभावनेचा दबाव विचारात घेता प्रशासनाने लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी रात्रीपर्यंत नागरिकांना खरेदी करता येईल. त्यानंतर मध्यरात्री 12 वाजल्यापासून लॉकडाउन सुरु होईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याबाबत पुढील परिस्थितीचा विचार करून लॉकडाऊन कधी संपवायचा, याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, कोरोनाची साखळी तुटावी व समूह संसर्गाचा धोका होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. बुधवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून संपूर्ण बारामती शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आले आहे.
  
Edited by : Nilesh Shende