esakal | बारामतीकरांनो, उद्या लॉकडाउन संपणार, पण ही आहेत बंधने 
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

बारामती शहरातील लॉकडाउन संपवित शुक्रवारपासून सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने सुरु करण्यास आज परवानगी देण्यात आली.

बारामतीकरांनो, उद्या लॉकडाउन संपणार, पण ही आहेत बंधने 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरातील लॉकडाउन संपवित शुक्रवारपासून सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने सुरु करण्यास आज परवानगी देण्यात आली. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबत आज आदेश जारी केले. 

राज्य सरकरने 29 जून रोजी जारी केलेल्या आदेशान्वये शहरातील सर्व दुकाने सुरु होणार आहेत. शाळा, महाविद्यालये, जिम यांच्यावर बंधने कायमच असून, हॉटेलमध्ये 33 टक्के ग्राहकांना परवानगी दिली जाणार आहे. मोकळ्या जागेमध्ये मॉर्निंग वॉक व इव्हिनिंग वॉकला परवानगी असेल.

नापास विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, पास होण्याची संधी आलीये चालून...
 
दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रात मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार व दुकाने बंद राहणार आहेत. या निर्णयामुळे बारामतीचे दैनंदिन जीवन शुक्रवारपासून पुन्हा सुरळीत होणार आहे. अर्थात दुपारी तीन वाजता दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले असल्याने ग्राहकांना दुपारी तीनच्या आत आपली खरेदी संपवावी लागणार आहेत. त्यामुळे पुन्हा दुकानात गर्दी होईल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामतीत आज एकाच दिवशी 13 रुग्ण सापडल्यानंतर पुन्हा लॉकडाउन वाढवले जाणार का, अशी चर्चा होती, मात्र प्रशासनाने दिलासा देत लॉकडाउन संपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला दिलासा मिळणार असून, व्यवहार हळुहळू सुरळीत होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.