esakal | लॉकडाउनमध्येही आयटी कंपन्यांचे 'उद्योग'सुरूच

बोलून बातमी शोधा

it company
लॉकडाउनमध्येही आयटी कंपन्यांचे 'उद्योग'सुरूच
sakal_logo
By
सकाळ वृत्तसंस्था

बालेवाडी- कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाकडून 'ब्रेक द चेन 'नियमावली जाहीर करून सर्वत्र लॉकडाऊन जरी जाहीर केले, तरी अनेक कर्मचारी हे वर्क फ्रॉम होम करत आहेत, तर अजूनही अनेक रहिवासी इमारतींमध्ये काही कंपन्यांनी आपली कार्यालये सुरूच ठेवली आहेत. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हा संसर्ग वाढतो आहे. कर्मचाऱ्यांना आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला त्रास होईल अशी भीती मनात सतत जाणवते आहे.

बाणेर बालेवाडी भागात अनेक आयटी कंपनी आहेत किंवा आयटी क्षेत्रात काम करणारे बहुसंख्य कर्मचारी या भागांमध्ये राहतात. फेब्रुवारी महिन्या पासूनच बाणेर बालेवाडी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अनेक सोसायट्यांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे,तर काही सोसायट्यांमधील नागरिकांनी बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश निषिद्ध केला आहे. अशी परिस्थिती असताना अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याचे आदेश दिले आहेत, तर काही कंपन्यांमध्ये मात्र अजूनही कर्मचाऱ्यांना कामावर बोलवले जात आहे. या भागात काही कंपन्यांची कार्यालये ही निवासी सोसायट्यांमध्ये असून ती अजूनही सुरू आहेत. या ठिकाणी पुण्यातील विविध भागातून लोक येत असल्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखणार कसा

हेही वाचा: पुणे मार्केट यार्डात होणार कोविड लसीकरण केंद्र

असा मोठा प्रश्नच आहे?

कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असून रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, ऑक्सिजनचा तुटवडा आहे, गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढते आहे. अशा परिस्थितीत कंपनीकडे घरातून काम करण्याचा पर्याय उपलब्ध असताना काही कंपनीमध्ये मात्र कर्मचाऱ्यांना कामावर बोलावल्याचा दुराग्रह केला जात आहे. या कोरोना काळात हा दुराग्रह चांगलाच भोवू शकतो. त्यामुळे येथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तसेच ज्या सोसायटीत अशा कंपन्या आहेत तिथल्या रहिवाशांना ही असुरक्षित वाटत आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना तातडीने फायर ऑडिटचे आदेश

आम्हाला कामासाठी रोज ऑफिसला जावे लागते. पण यामुळे घरात लहान मुले आहेत,आई वडील आहेत त्यांना आपल्या मुळे कोरोना होऊ शकतो अशी सतत भीती वाटत राहते. त्यामुळे घरी गेल्यावर त्यांच्याबरोबर न राहता मी स्वतः वेगळ्या खोलीमध्ये राहतो. त्यामुळे कुटुंबाबरोबर राहूनही कुटुंबात न राहील्याची, एकाकीपणाची भावना जाणवते आहे. तसेच खूप मानसिक त्रास होतो आहे, अशी प्रतिक्रिया एक आयटी कर्मचाऱ्याने दिली.