esakal | पुण्यातील मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभागातील व्यापार दिवसाआड
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Marketyard

पुण्यातील मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभागातील व्यापार दिवसाआड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे (मार्केट यार्ड) : बाजारातील सर्व व्यवहार सुरू ठेवून बाजारातील गर्दी कमी करण्यावर बाजार समिती प्रशासनाने भर दिला आहे. परंतु अजून गर्दी कमी करण्यासाठी समितीने फळे, भाजीपाला विभागातील व्यापार बुधवार (ता. २१) पासून दिवसाआड पद्धतीने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उद्या (बुधवार) बाहेरच्या बाजूचे गाळेधारक, तर परवा (गुरूवारी) आतील बाजूचे गाळेधारकांचा व्यापार सुरू असणार आहे. शनिवार आणि रविवार वगळता फळे व भाजापीला, कांदा-बटाटा विभागातील व्यापार दिवसाआड सुरू राहिल. असा आदेश बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी सोमवारी काढला आहे.

हेही वाचा: फ्रंटलाईन आरोग्य सेवकांसाठी 50 लाखांची विमा योजना पुन्हा सुरू करा : डॉ. अमोल कोल्हे

मार्केटयार्डात खरेदी तसेच विक्रीसाठी होणार्‍या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून बाहेरील गाळे आणि आतील गाळ्यावरील व्यापार दिवसाआड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रात्री 9 ते पहाटे 4 या वेळेत शेतमील बाजारात आणता येणार आहे. आलेल्या मालाची विक्री पहाटे 3 ते दुपारी 2 या वेळेत सुरू असणार आहे. तसेच शेतीमाल खाली झाल्यानंतर रिकाम्या वाहनांनी बाजारात थांबू नये. अशा सूचनांचा आदेशात समावेश आहे.