लॉकडाऊनने नोकरी हिरावली परंतु 'बैलगाडी'ने दिली जगण्याची उमेद

लॉकडाऊन मध्ये नोकरी गेल्यापासून तुषार सणस या तरुणाने सागवानी लाकडापासून आकर्षक शोभेची बैलगाडी बनविण्यास सुरुवात केली.
Bullockcart
BullockcartSakal
Summary

लॉकडाऊन मध्ये नोकरी गेल्यापासून तुषार सणस या तरुणाने सागवानी लाकडापासून आकर्षक शोभेची बैलगाडी बनविण्यास सुरुवात केली.

किरकटवाडी - घरची परिस्थिती साधारण असताना अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. चांगल्या कंपनीत अधिकारी पदावर नोकरी मिळाली. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक कोरोना (Corona) आजाराने थैमान घातले आणि लॉकडाऊन (Lockdown) झाले. कंपनीतील नोकरी गेल्याने बेरोजगारीची (Unemployed) कुऱ्हाड कोसळली. परिवाराची जबाबदारी होती. खचून न जाता अंगात असलेल्या कलेच्या जोरावर नवीन सुरुवात करायचे ठरवले. तरुणाची धडपड कामी आली. वर्षभरात व्यवसाय एवढा वाढला आहे की, आज संपूर्ण परिवार 'शोभेची बैलगाडी' (Decorative Bullockcart) बनविण्यासाठी या तरुणाला मदत करतोय. नोकरी गमवलेला तरुण आज मोठ्या व्यसायाचा मालक बनला आहे. कलेला व्यावसायिक रुप देणाऱ्या नांदोशी (ता. हवेली जि. पुणे) या छोट्याशा खेडे गावातील तुषार सणस (Tushar Sanas) या तरुण व्यावसायिकाचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

लॉकडाऊन मध्ये नोकरी गेल्यापासून तुषार सणस या तरुणाने सागवानी लाकडापासून आकर्षक शोभेची बैलगाडी बनविण्यास सुरुवात केली. फेसबुक, व्हॉट्स ॲप, यु ट्युब व इतर समाज माध्यमांतून या व्यवसायाची जाहिरात केली. दिसायला अत्यंत आकर्षक व ग्रामीण परंपरा जोपासणारी बैलगाडी आज पुणे, सातारा,सांगली, कराड, कोल्हापूर, नंदुरबार, मुंबई, अहमदनगर, रायगड यांसह महाराष्ट्रातील इतर शहरांत व कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांत आणि एवढेच नाही तर दुबई, सिंगापूर, अमेरिका येथे वास्तव्यास असलेल्या भारतीयांपर्यंत पोहोचली आहे.

Bullockcart
वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णाचा जीव टांगणीला

आकारानुसार बारा ते चाळीस हजार रुपयांपर्यंत किंमत असलेल्या तुषार सणस यांच्या बैलगाडीची मागणी सध्या खूप वाढली आहे. तुषार यांचा भाऊ नितीन सणस यांच्यासह घरातील सर्व सदस्य आता या व्यवसायात पुर्णवेळ काम करत आहेत. बैलगाडी तयार करण्याचा छोटा व्यवसाय एका उद्योगात रुपांतरीत झाला आहे. बैलगाडीच्या निर्मितीपासून ते विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तुषार सणस यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.आतापर्यंत त्यांनी 540 बैलगाड्या विकल्या असून पुढील 230 बैलगाड्यांची आगाऊ नोंदणी झालेली आहे.

"लहानपणापासून लाकडी वस्तू बनविण्याचा छंद होता. लॉकडाऊन मध्ये नोकरी गेल्याने खचलो होतो. घरी असताना मार्केटमधून सागवानी लाकूड आणून बैलगाड्या तयार करण्यास सुरुवात केली. ऑनलाईन जाहिरात केली. यासाठी भाऊ नितीन याने खुप साथ दिली. हौशी नागरिकांनी आमच्या बैलगाडीला पसंती दिली. महिन्याला सर्व खर्च जाता दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळत आहे. परदेशातूनही बैलगाडीला मोठी मागणी आहे. या व्यवसायाला मोठ्या उद्योगाचे स्वरूप द्यायचे माझे स्वप्न आहे."

- तुषार सणस, बैलगाडी व्यावसायिक, नांदोशी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com