मॅजिक बस शुभारंभ प्रकल्पाचा लॉकडाऊन मधे अनोखा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन अंतर्गत मॅजिक बस शुभारंभ प्रकल्पाने घरात चौदा दिवस अडकलेल्या व निगडे शाळेमध्ये शिकणार्या लहानग्यांना विरंगुळा म्हणून ऑनलाइन उन्हाळी शिबीरासाठी आयोजन केले होते. 

टाकवे बुद्रुक - मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन अंतर्गत मॅजिक बस शुभारंभ प्रकल्पाने घरात चौदा दिवस अडकलेल्या व निगडे शाळेमध्ये शिकणार्या लहानग्यांना विरंगुळा म्हणून ऑनलाइन उन्हाळी शिबीरासाठी आयोजन केले होते. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या उपक्रमात विद्यार्थांच्या पालकांशी फोनवर चर्चा करुन व व्हॉट्सअॅप ग्रुपचा योग्य वापर करत शुभारंभाचे सतीश थरकुडे यांनी "कोरोना जनजागृती " या विषयी चित्र काढण्याचे आवाहन केले. यास निगडे गावातील प्रतिष्ठित मान्यवरांनी तसेच विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

ग्रुपवरच चित्र पाठवल्याने अनेकांनी मुलांचे कौतुक केले तर शुभारंभ प्रकल्पांतर्गत मुलांना लॉकडाऊन संपल्यानंतर प्रशस्तीपत्र वाटप केले जाणार असल्याचे प्रकल्प अधिकारी विकास मोढवे यांनी सांगीतले.

शाळेचे आदर्श शिक्षक आदिनाथ शिंदे यांनी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या प्रकल्पात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 
सरपंच सविता भांगरे यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत आभार मानले तर उपसरपंच रामदास चव्हाण यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातुन घेण्यात आलेल्या व कोरोना बाबत जनजागृती करणार्या प्रकल्पाचे कौतुक केले. पालक व तरुण वर्गाने मुलांनी काढलेल्या चित्रांचे कौतुक केले.

निगडे - येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी कोरोना जनजागृती विषयी काढलेली चित्रे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown of the Magic Bus Launch Project