esakal | Coronavirus : मावळातील शहरांमध्ये आता सक्तीचे लॉकडाउन
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव मावळ ः चैत्र पौर्णिमेच्या उत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी बाजारपेठेत रूटमार्च केले.

दृष्टिक्षेपात मावळ...

 • तळेगाव दाभाडे येथे गुरुवार (ता. ९) व शुक्रवारी (ता. १०) संपूर्ण लॉकडाउन पाळण्याचा निर्णय व्यापारी व नागरिकांनी घेतला आहे.
 • वडगाव नगरपंचायतीने लॉकडाउनसाठी गुरुवार (ता. ९) व शुक्रवारी (ता. १) तसेच सोमवार (ता. १३) व (ता. १४) लॉकडाउनची घोषणा केली आहे.
 • लोणावळ्यात किरकोळ गोष्टींसाठीही नागरिक घराबाहेर पडत असून, येथे सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडला आहे.
 • कामशेतमध्ये गुरूवार (ता. ९) व शुक्रवारी (ता. १०) संपूर्ण लॉकडाउन पाळण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. 
 • पवनानगर धरण परिसरात पुणे-मुंबईकर गर्दी करीत असून, काले ग्रामपंचायतीने दिवसाआड बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 • पवन मावळातील सोमाटणे, गोडूंब्रे, सडवली, आढे, उर्से आदी गावांतील वार्षिक उत्सव यंदा रद्द करण्यात आले आहेत.
 • देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत शुक्रवार (ता. १०) व शनिवारी (ता. ११)  लॉकडाउन करण्यात येणार आहे.

Coronavirus : मावळातील शहरांमध्ये आता सक्तीचे लॉकडाउन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून देशभरात लॉकडाउन सुरू आहे. मावळ तालुक्‍याच्या ग्रामीण भागात लॉकडाउनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, शहरी भागात सकाळी जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी वर्दळ दिसून येते. त्यामुळे तालुक्‍यातील मुख्य शहरांतील प्रशासनाकडून येत्या आठवडाभरात काही दिवस सक्तीचे लॉकडाउन  करण्याचे नियोजन केले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तालुक्‍यात अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली फिरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगची एैशी-तैशी होताना दिसते. दुपारच्या सत्रात मात्र बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरतो. पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आत्तापर्यंत शंभराहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. जीवनावश्‍यक वस्तूंच्या विक्रीसाठी व्यापारी व व्यावसायिकांना वेळा ठरवून दिलेल्या आहेत. सुरूवातीच्या काळात या वेळा पाळल्या जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिसांनी कडक भूमिका घेतली. कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता वेळा पाळल्या जात आहेत. पोलिसांनी गेल्या आठ दिवसांत अनेक नागरिकांवर गुन्हा दाखल करून त्यांची वाहनेही जप्त केली आहेत. गर्दी टाळण्यासाठी तळेगाव, कामशेत, वडगाव, देहूरोडमधील व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दोन दिवस पूर्ण लॉकडाउन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांचा उत्सव रद्द करण्यात आला.

दृष्टिक्षेपात मावळ...

 • तळेगाव दाभाडे येथे गुरुवार (ता. ९) व शुक्रवारी (ता. १०) संपूर्ण लॉकडाउन पाळण्याचा निर्णय व्यापारी व नागरिकांनी घेतला आहे.
 • वडगाव नगरपंचायतीने लॉकडाउनसाठी गुरुवार (ता. ९) व शुक्रवारी (ता. १) तसेच सोमवार (ता. १३) व (ता. १४) लॉकडाउनची घोषणा केली आहे.
 • लोणावळ्यात किरकोळ गोष्टींसाठीही नागरिक घराबाहेर पडत असून, येथे सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडला आहे.
 • कामशेतमध्ये गुरूवार (ता. ९) व शुक्रवारी (ता. १०) संपूर्ण लॉकडाउन पाळण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. 
 • पवनानगर धरण परिसरात पुणे-मुंबईकर गर्दी करीत असून, काले ग्रामपंचायतीने दिवसाआड बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 • पवन मावळातील सोमाटणे, गोडूंब्रे, सडवली, आढे, उर्से आदी गावांतील वार्षिक उत्सव यंदा रद्द करण्यात आले आहेत.
 • देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत शुक्रवार (ता. १०) व शनिवारी (ता. ११)  लॉकडाउन करण्यात येणार आहे.
loading image
go to top