Video : शेळ्या मेंढया राखल्या नाहीतर कोण खर्ची देईन...

रामदास वाडेकर
Friday, 24 April 2020

आदिवासी कातकरी व ठाकर समाजातील बायाबापडया धनिक शेतकऱ्यांकडे शेतीत काम करून रोजगार मिळवत आहे. नाहीतर वीटभट्टीवर रणरणत्या उन्हात वीट थापीत आहे. हेच त्याच्या रोजगाराचे मुख्य साधन. सध्या शेतीच्या कामाला फारसे मजुरांची गरज नाही. आणि वीटभट्टीचे काम संपत आले आहे. शासनाने तसेच सामाजिक संस्थेच्या वतीने गरीब गरजूंना अन्नधान्याचे किट दिले आहे.

कामशेत - शेळ्या मेंढ्या राखतो..त्यांना रानावनात चारून आणतो..त्या मोबदल्यात चार पैसे मिळाल्यात..शेळ्या मेंढया राखल्या नाहीतर कोण खर्ची देईन...पोटासाठी ही कामे करावी लागतात...मावळ तालुक्यातील कातकरी भगिनी द्रोपदाबाई काळूराम हिलम शेळ्या चारताचारता सांगत होती.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आदिवासी कातकरी व ठाकर समाजातील बायाबापडया धनिक शेतकऱ्यांकडे शेतीत काम करून रोजगार मिळवत आहे. नाहीतर वीटभट्टीवर रणरणत्या उन्हात वीट थापीत आहे. हेच त्याच्या रोजगाराचे मुख्य साधन. सध्या शेतीच्या कामाला फारसे मजुरांची गरज नाही. आणि वीटभट्टीचे काम संपत आले आहे. शासनाने तसेच सामाजिक संस्थेच्या वतीने गरीब गरजूंना अन्नधान्याचे किट दिले आहे.

आजची भूक भागली असली तरी उद्या काय खायचे या विवेचनात  सगळेच आहेत. याच आदिवासी बांधव देखील आहे, उद्याच्या पोटभर जेवणासाठी आदिवासी महिला राबत आहे. कोणी लाकडे सरपण गोळा करते, तर कोणी शेतकऱ्यांच्या शेतावर राबत आहे. कोणी धरणाच्या पाण्यात मासेमारी करते तर कोणी रानावनात दुसऱ्याच्या शेळ्या मेंढ्या राखीत आहे. 

लाॅकडाऊनचा सर्वात मोठा फटका गरीब मजुरांना सोसावा लागत आहे, शहरात मदतीचे अनेक हात पुढे येत आहे. पण खेडोपाडी केलेली ही तुटपुंजी मदत गरीबा घरची महिना दोन महिन्याची भूक भागवणार नाही. आपल्या पोटाला चिमटा बसू नये, मुलेबाळे उपाशी राहू नये म्हणून द्रोपदाबाई सारख्या कित्येक भगिनी अनवाणी पायाने शेळ्या मेंढया राखीत आहे. मावळ तालुक्यात शेळया मेंढया राखोळीने घेण्याची पद्धत आहे. 

एका शेतकऱ्यांकडून शेळ्या घेऊन  वर्षभर संभाळयाच्या आणि वर्षअखेरीस संभाळणा-या आदिवासी महिलेला त्याबद्दल मोबदला द्यायचा अशी ही राखोळी आहे. गुढीपाडवा किंवा  अक्षय्य तृतीयाला राखोळीचा वर्षाचा हिशोब केला जातो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown tribal katkar thakar society issue food employment