esakal | पुण्यातील 'या' भागात पुन्हा लाॅकडाऊन!
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील 'या' भागात पुन्हा लाॅकडाऊन!

4 ते 11 जुलै या कालावधीत फक्त दूध, मेडिकल, किराणा दवाखाने व सरकारी रेशनवरील अन्न धान्यांची दुकानेच चालू राहणार आहेत.

पुण्यातील 'या' भागात पुन्हा लाॅकडाऊन!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : सिंहगड रस्ता परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुणे महानगरपालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वडगाव बुद्रुक ४ जुलैपासून पुढे आठ दिवसांसाठी पूर्ण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. या लाॅकडाऊन काळात या भागातील केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३३ वडगांव धायरी या प्रभागामध्ये माहे १ मे २०२० पासून कोरोना विषाणुचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. या भागाची महापालिका अधिकार्यांनी पाहणी केली. त्यावेळी वडगांव बुद्रुक भाग प्रतिबंधित क्षेत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरच्या क्षेत्रात नव्याने कोव्हिड १९ बाधित ३ पेक्षा जास्त रुग्ण सापडल्यास असे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात येतात. वडगांव ब्रु. मधील गावठाण भागात गेल्या काही दिवसात ३ पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, हा भाग पुढील आठ दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे.

या सेवा राहणार सुरु

4 ते 11 जुलै या कालावधीत फक्त दुध, मेडिकल, किराणा दवाखाने व सरकारी रेशनवरील अन्न धान्यांची दुकानेच चालू राहणार आहेत. याशिवाय सर्व व्यापारी आस्थापना ८ दिवसाच्या काळात बंद राहणार आहेत. सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत चालू राहणार आहेत, त्यानंतर बंद असणार आहेत.

रस्त्यावर भाजीपाला विक्रीस मनाई

रस्त्यावर अगर रस्त्याच्या कडेला भाजीपाला व फळ विक्रीस ही बंधन घालण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी या काळात घरी थांबुन या आदेशाचे पालन करावे. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये आणि वाहनांवरून बाहेर फिरू नये. अन्यथा साथीचे रोग अधिनियम १८ ९ ७ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश प्रभारी महापालिका सहाय्यक आयुक्त संभाजी खोत यांनी दिले आहेत. तसेच सिंहगड रस्ता पोलिसांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा