दिलासादायक बातमी; लॉकडॉऊनमध्ये पीएफ फडांतून काढू शकता ७५ टक्के रक्कम!

In Lockdown you can withdraw 75 percent of the amount from PF.jpg
In Lockdown you can withdraw 75 percent of the amount from PF.jpg

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पीएफ कार्यालयाने विशेष बाब म्हणून पीएफ फंडामधील 75 टक्‍क्‍यांपर्यत रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार देशभरातून 12 लाख 91 हजार सदस्यांनी पीएफ मधील 4 हजार 684 कोटी रुपयांची रक्कम आतापर्यंत काढली आहे. त्यापैकी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष बाब म्हणून 7 लाख 40 हजार सदस्यांनी 2 हजार 367 कोटी रक्कम काढली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पीएफ कार्यालयांमध्ये कमीत कमी मनुष्यबळ असताना काही क्‍लेम हे अवघ्या 72 तासात निकाली काढून संबधित व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे, अशी माहिती पीएफ कार्यालयाकडून देण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पीएफ कार्यालयाने करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पीएफ योजनेतून पैसे काढण्याची तरतूद केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने राजपत्र प्रसिध्द केले आहे. दि.28 मार्च 2020 पासून ही योजना पीएफ कार्यालयाने आणली आहे. या तरतुदीनुसार पीएफ खात्यामधील सदस्याच्या जमा असलेल्या रकमेच्या 75 टक्‍क्‍यांपर्यंत रक्कम काढू शकतात. पीएफ खात्यामधून काढलेली रक्कम पुन्हा भरण्याची आवश्‍यकता नाही. तसेच सदस्य कमी रकमेसाठीसुध्दा अर्ज करू शकतात, असे पीएफ कार्यालयाकडून सांगण्यात आले.


Coronavirus : पुण्याच्या महापौरांचे पत्र व्हायरल; रोहित पवारांनी केला खुलासा

लॉकडाऊनमुळे पीएफ कार्यालयात एक तृतीयांश इतके कर्मचारी काम करतात. तर पुणे येथील कार्यालयात 10 टक्केच कर्मचारी आहेत. इतक्‍या कमी मनुष्यबळात पीएफ ची रक्कम संबधित कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तर काही कार्यालयातील कर्मचारी सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत काम करत सदस्यांचे अर्ज निकाली काढत आहेत.

आम्ही राजस्थानमध्ये अडकलो होतो, पण महाराष्ट्र सरकारने...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com