
लोहगाव : लोहगाव-वाघोली रस्ता रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता प्रचंड वर्दळीचा रस्ता असून या ठिकाणाहून दररोज हजारो वाहने ये-जा करतात, मात्र रुंदीकरणासाठी केलेल्या खोदाईमुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढल्याने हे काम तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे.